Tur, Tomato Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Crop Rate : टोमॅटो, मूग वगळता प्रमुख पिकांच्या दरात घसरण

Market Update : कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे कांद्याचे भाव उतरले. टोमॅटोच्या किमती रु. १५०० वर स्थिर आहेत. या सप्ताहात टोमॅटो व मूग वगळता सर्व वस्तूंच्या किमती घसरल्या.

डॉ. अरुण कुलकर्णी

फ्यूचर्स किंमती : सप्ताह १६ ते २२ डिसेंबर २०२३
कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे कांद्याचे भाव उतरले. टोमॅटोच्या किमती रु. १५०० वर स्थिर आहेत. या सप्ताहात टोमॅटो व मूग वगळता सर्व वस्तूंच्या किमती घसरल्या. २२ डिसेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात ०.९ टक्क्याने घसरून रु. ५५,१८० वर आले होते. या सप्ताहात ते ०.६ टक्क्याने घसरून रु. ५४,८६० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स भाव १ टक्क्याने घसरून रु. ५६,१२० वर आले आहेत. मार्च फ्यूचर्स भाव रु. ५७,६६० वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.१ टक्क्यांनी अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात ०.२ टक्क्याने घसरून रु. १,३९९ वर आले आहेत. फेब्रुवारी भाव रु. १,५३० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५७३ वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा १२.४ टक्क्यांनी अधिक आहेत. हेजिंग करण्यासाठी या भावांचा विचार करावा. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत.

मका
NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) गेल्या सप्ताहात रु. २,२०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.३ टक्क्यांनी घसरून रु. २,१५० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (जानेवारी डिलिव्हरी) किमती रु. २,१६२ वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स किमती रु. २,१८८ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.५ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहेत. मक्याची आवक वाढत आहे; पण मागणीसुद्धा वाढत आहे.

हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १३,४१३ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १ टक्क्याने घसरून रु. १३,२८३ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. १४,२१४ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ७ टक्क्यांनी जास्त आहेत.

हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात ३.८ टक्क्यांनी घसरून रु. ५,६५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे.

मूग
मुगाची स्पॉट किमत (मेरटा) रु. ८,६५० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ५,१०१ वर आली होती. या सप्ताहात ती ५ टक्क्यांनी घसरून रु. ४,८४८ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

तूर
तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात ७.१ टक्क्यांनी घसरून रु. ८,६३८ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. गेल्या दोन महिन्यांत तुरीच्या किमती वाढत होत्या; मात्र त्या सध्या कमी होत आहेत.

कांदा
कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. २,७९२ होती; या सप्ताहात येथील किंमत रु. १,८७७ वर आली आहे.

टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,५०० वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर स्थिर आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT