Solapur APMC Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Rate : सोलापुरात डाळिंबाच्या आवकेत घट, दर वधारले

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाच्या आवकेत मोठी घट झाली, पण मागणी असल्याने दरात पुन्हा तेजी राहिली.

सुदर्शन सुतार

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Solapur APMC) आवारात गतसप्ताहात डाळिंबाच्या आवकेत (Pomegranate Rate) मोठी घट झाली, पण मागणी असल्याने दरात पुन्हा तेजी राहिली. डाळिंबाला प्रतिक्विंटलला सर्वाधिक १५ हजार रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाची आवक एक ते दीड टन झाली. डाळिंबाची आवक जिल्ह्यातूनच मंगळवेढा, सांगोला, माढा, मोहोळ, पंढरपूर भागातून झाली. पण मूळात मागणीच्या तुलनेत आवक नाही. त्यामुळे आवक आणि दरात मोठी तफावत निर्माण झाली.

बाजारातील रोजच्या आवकेच्या तुलनेत निम्म्याने त्याच्या आवकेत घट झाली. शिवाय पावसामुळे डाळिंबाची गुणवत्ताही कमी झाली आहे. त्यामुळे उच्चप्रतीच्या डाळिंबाला चांगला उठाव मिळतो आहे. या सप्ताहातही तशीच परिस्थिती राहिली.

डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी ५००० रुपये आणि सर्वाधिक १५ हजार रुपये इतका दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही आवकेत काहीसा चढ-उतार राहिला. पण दर मात्र १०० ते २०० रुपयांच्या फरकाने असेच राहिले. त्याशिवाय गवार, भेंडी, वांगी यांना चांगला उठाव मिळाला. गवार आणि वांग्याची आवक प्रत्येकी २ ते ५ क्विंटल अशी जेमतेम तर भेंडीची १० क्विंटलपर्यंत आवक राहिली. पण मागणीतील सातत्य टिकून राहिल्याने त्यांना दर काहीसा चांगला मिळाला.

गवारला प्रतिक्विंटलला किमान ३००० रुपये, सरासरी ४५०० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये, भेंडीला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये तर वांग्याला किमान १००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये असा दर मिळाला.

कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव

या सप्ताहात कांदा, कोथिंबीर आणि मेथीला काहीसा उठाव मिळाला. कांद्याची रोज १०० ते २०० गाड्यापर्यंत आवक राहिली. तर कोथिंबीर आणि मेथीची प्रत्येकी १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत आवक राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, तर कोथिंबिरीला शंभर पेंढ्यासाठी ७०० ते १००० रुपये आणि मेथीला ८०० ते १३०० रुपये असा दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026: माॅन्सूनची आगेकूच सुरुच; माॅन्सूनने संपूर्ण अंदमान आणि निकोबर बेटे व्यापून वाटचाली कायम ठेवली

Farm Loan Repayment: यंदाच्या वर्षातील वसूलपात्र रक्कम मुदतीत भरा : मंत्री हसन मुश्रीफ

Onion Rate Issue: कांदा साठवावा तर सडतोय, विकावा तर मातीमोल भाव

Interview with Raju Shetti: ‘कोकणच्या पुढाऱ्यांनी प्रश्‍नांचं गांभीर्य समजून घ्यावं’

Khandesh Irrigation Projects: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण

SCROLL FOR NEXT