Chana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Market Rate : हरभऱ्याच्या भावात तीन कारणांमुळे नरमाई; फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये दरात घसरण

Chana Update : मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारांमधील सरासरी हरभरा भाव हमीभावापेक्षा कमी होता.

Anil Jadhao 

Pune News : हरभऱ्याच्या भावात फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये काहीशी नरमाई आली. केंद्र सरकारची ६० रुपये किलोने डाळ विक्री, पिवळ्या वाटाण्याची मुक्त आयात आणि नव्या हरभऱ्याची बाजारातील आवक, या कारणांमुळे हरभऱ्याच्या भावात नरमाई आली आहे. 

केंद्र सरकारने यंदा हरभऱ्यासाठी ५ हजार ४४० रुपये हमीभाव जाहीर केला. पण सध्या देशातील महत्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये भावपातळी सध्या हमीभावाच्या दरम्यान किंवा त्यापेक्षा कमी होती. मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारांमधील सरासरी हरभरा भाव हमीभावापेक्षा कमी होता. 

मध्य प्रदेशातील हरभरा आवक जास्त असलेल्या बाजारांमध्ये सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर राजस्थानमधील ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये आणि महाराष्ट्रात ५ हजार १०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशभरातील बाजाराचा विचार करता सध्या काही बाजारात हरभरा हमीभावाच्या दरम्यान आहे. तर काही बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. 

देशातील हरभऱ्याची काढणी जवळपास पूर्ण झाली. त्यामुळे होळीनंतर बाजारातील आवक वाढण्याची शक्यता आहे. हरभऱ्याला मागणी चांगली आहे. पण पिवळा वाटाणा आयातही वाढत आहे. त्यामुळे हरभऱ्याला स्वस्त पर्याय उपलब्ध असून मागणी काहीशी कमी होत आहे. नवा माल बाजारात वाढत असल्याने दरावर काहीसा दबाव आला.

पिवळा वाटाणा आयातीचा दबाव

देशातील डाळींचे भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ८ डिसेंबर २०२३ रोजी पिवळा वाटाणा आयात ३० एप्रिलपर्यंत खुली केली. त्यामुळे आयात मोठ्या प्रमाणात वाढली. फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत देशात तब्बल ६ लाख टन पिवळा वाटाणा आयात झाला. तर ३० एप्रिलपर्यंत ही आयात १५ लाख टनांपर्यंत पोहचू शकते, असा अंदाज आयातदार व्यक्त करत आहेत. पिवळा वाटाणा आयात वाढल्याचा दबाव हरभरा भावावर येत आहे. 

सरकारने देशात डाळींचा पुरवठा वाढावा यासाठी पिवळा वाटाणा आयात खुली केली. त्यामुळे आयात वाढली. परिणामी हरभरा डाळीचे भावही कमी झाले. भारतात प्रामुख्याने रशिया आणि कॅनडातून पिवळा वाटाणा आयात होत असते.
राहूल चौहान, संचालक, आयग्रेन इंडिया

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT