Cotton Farming Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Production: मोताळा तालुक्यात घटणार कापसाचा पेरा

Cotton Production Issue: मोताळा तालुक्यात खरीप २०२५ हंगामात कापसाचे क्षेत्र ३ हजार हेक्टरने घटण्याचा अंदाज आहे. हे क्षेत्र मक्याकडे वळणार असून, बियाणे व खताचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

 गोपाल हागे

Buldana News: या वर्षी खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असून यंदा कपाशीच्या पेऱ्यात तीन हजार हेक्टरने घट येणार असून हे क्षेत्र मका लागवडीखाली परावर्तित होऊ शकते. सोयाबीन तुरीचे क्षेत्र ‘जैसे थे’ राहणार असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. खते व बियाण्याचा काळाबाजार होऊ नये यासाठी कृषी विभागातर्फे भरारी पथक नेमण्यात आले आहेत.

मोताळा तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी एकूण ५७ हजार ८६२ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कापूस, तूर मका व सोयाबीन या पिकांचा समावेश आहे. कापसाचे क्षेत्र मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये तीन हजार हेक्टरने कमी होऊन २९ हजार ७५० हेक्टरवर येईल, असा अंदाज कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.

तसेच सोयाबीनचे क्षेत्र व तुरीचे क्षेत्र मागील वर्षी म्हणजे अनुक्रमे १२ हजार पाचशे हेक्टर व ५ हजार हेक्टर एवढे राहील. मक्याचे क्षेत्र तीन हजार हेक्टरने वाढून एकूण १० हजार हेक्टरपर्यंत जाण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. इतर पिकांमध्ये मूग, उडीद, भुईमूग, ज्वारी व बाजरी या पिकांचा समावेश आहे.

बियाण्याचा विचार केला तर कपाशीच्या २९ हजार ७५० हेक्टरसाठी एक लाख ४८ हजार ७५० पाकिटांची आवश्यकता असून सदरचा साठा मुबलक उपलब्ध होणार आहे. सोयाबीनमध्ये लागणारे १२ हजार ५०० क्विंटल बियाण्यापैकी १० हजार क्विंटल बियाणे शेतकरी घरचेच वापरणार असून उर्वरित २ हजार ५०० क्विंटल बियाणे महाबीज, एनएससी व इतर प्रायव्हेट कंपन्यांकडून उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे तालुक्यामध्ये बियाण्याचा मुबलक साठा आहे. खताचा विचार केला तर खरिपासाठी एकूण १६ हजार ५३१ टन खताची आवश्यकता असून ग्रेडनिहाय लागणारे रासायनिक खते विक्रेत्यांकडे दर महिन्याला उपलब्ध होणार आहे.

शेतकऱ्यांनी एकाच वाणाचा आग्रह धरू नये. सदर खते व बियाणे विक्री करताना शेतकऱ्यांच्या सोबत काही फसवणूक होऊ नये यासाठी तालुक्यामध्ये भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत. तसेच तालुक्यातील खते व बियाणे विक्रेते यांच्यावर निरीक्षणासाठी संपर्क अधिकारी म्हणून कृषी सहायक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT