Cotton Market Update Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापूसदरावर दबाव कायम

मागील महिन्यात प्रतिदिन सरासरी सहा हजार कापूस गाठींची म्हणजेच ३० हजार क्विंटल कापसाची आवक होत होती. ही आवक पुढे आणखी वाढणार आहे.

Team Agrowon

Cotton Market Update Jalgaon : खानदेशात रोज ४० हजार क्विंटल कापसाची म्हणजेच आठ हजार गाठींएवढ्या (Cotton Production) (एक गाठ १७० किलो रुई) कापसाची आवक (Cotton Arrival) होत आहे. ही आवक मागील महिन्याच्या तुलनेत दीड पट आहे. खेडा खरेदीत प्रतिक्विंटल दर ७५०० ते ७६०० रुपये मिळत आहे.

मागील महिन्यात प्रतिदिन सरासरी सहा हजार कापूस गाठींची म्हणजेच ३० हजार क्विंटल कापसाची आवक होत होती. ही आवक पुढे आणखी वाढणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पारोळा, अमळनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, चोपडा भागांत आवक बऱ्यापैकी आहे. पण जळगाव, यावल, मुक्ताईनगर, बोदवड भागांत आवक कमी आहे. रावेरात फारसे कापूस पीक नसते.

तसेच यावलमध्येही कापूस लागवड कमी असते. यामुळे या भागात आवक कमीच राहील, असे दिसत आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यात ७५ टक्के कापसाची विक्री पूर्ण झाली आहे. तसेच धुळे व शिंदखेडा तालुक्यांतही ७० टक्के कापसाची विक्री शेतकऱ्यांकडून पूर्ण झाली आहे.

नंदुरबारात शहादा व तळोदा तालुक्यांतही ८० टक्के कापसाची विक्री पूर्ण झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील आवक या महिन्यात अधिक सुरू झाली आहे. धुळे व नंदुरबारात नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये अनेकांनी कापूस विक्री केली.

खरेदीसाठी गुजरात, मध्य प्रदेशातील खरेदीदार येत आहेत. एजंटच्या मदतीने कापूस खरेदी सुरू असून, खेडा खरेदीला वेग आला आहे. धरणगाव (जि. जळगाव) येथील सर्वच जिनिंग प्रेसिंग कारखाने जोमात सुरू आहेत.

तसेच जामनेर व जळगावमध्येही कापूस प्रक्रियेला वेग आला आहे. दर्जेदार किंवा चांगला कापूस बाजारात येत आहे. दर प्रतिक्विंटल ७५०० ते ७६०० रुपये, असा खेडा खरेदीत मिळत आहे. कारखानदार थेट किंवा खेडा खरेदी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT