Cotton, Soybean Market Rate:कापूस, सोयाबीनच्या दरात किती वाढ झाली?

Anil Jadhao 

Cotton Rate

देशातील बाजारात कापूस दरात सुधारणा झाली आहे. आज अनेक बाजारांमध्ये कापूस दरात क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची सुधारणा झाली. आज कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ८०० ते ८ हजार १०० रुपये भाव मिळाला.

Cotton Market | Agrowon

Soybean Rate

देशातील बाजारात सोयाबीनला मागणी आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचे दर वाढले होते. त्याचाही आधार मिळत आहे. सोयाबीनला सध्या ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांचा दर मिळलाा.

Soybean Market | Agrowon

Tur Rate

देशात यंदा तुरीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे तुरीचा पुरवठा कमी राहीला. मागणी मात्र वाढलेली आहे. परिणामी तुरीच्या दरात तेजी आहे. आज अनेक बाजारात तुरीला ९ हजारांचा भाव मिळाला. तर सरासरी दरपातळी ८ हजार ते ९ हजार रुपये होती.

Tur Market | Agrowon

Chana Rate

देशातील बाजारात हरभऱ्याची आवक वाढत आहे. दुसरीकडे नाफेडची खरेदीही वाढत आहे. त्यातच देशातील अनेक भागात हरभरा उत्पादकतेला मोठा फटका बसला. त्यामुळं खुल्या बाजारात दरात सुधारणा झाली. हरभरा सध्या ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयाने विकला जात आहे.

Chana Rate | Agrowon

Onion Rate

राज्यातील बाजारात कांद्याची आवक मागील तीन दिवसांपासून वाढली आहे. लाल कांदा मार्च एन्डच्या आधी विकण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे कांदा दरात पुन्हा घट झाली. कांद्याला आज सरासरी ३०० ते ७०० रुपये दर मिळाला.

Onion Market | Sominath Gholawe

Maize Rate

मक्याचा हंगाम तोंडावर आहे. एप्रिलच्या मध्यापासून मक्याची आवक वाढेल. रब्बीत मका लागवड वाढली होती. मात्र मका पिकाला बदलते वातावरण आणि पावसाचा फटका बसला. त्यामुळे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. सध्या मक्याला २ हजार ते २ हजार २०० रुपये भाव मिळत आहे.

Maize Market | Agrowon
अधिक माहितीसाठी क्लिक करा