Kheda Kharedi Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Kheda Kharedi : खानदेशात खेडा खरेदीत कापूसदर नीचांकी स्थितीत

Cotton Market : कापूस दर मागील महिनाभरापासून हमीभावापेक्षा कमी आहेत. सुमारे १५ ते २० टक्के शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात खेडा खरेदीत कापूसदर नीचांकी स्थितीत पोहोचले असून, बुधवारी (ता. १९) व गुरुवारी (ता. २०) ६००० ते ६२०० रुपये प्रतिक्विंटल या दरात अनेक गावांत कापसाची खरेदी करण्यात आली.

कापूस दर मागील महिनाभरापासून हमीभावापेक्षा कमी आहेत. सुमारे १५ ते २० टक्के शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे.

त्याला नीचांकी दर असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. हमीभाव लांब धाग्याच्या कापसासाठी ७०२० रुपये प्रतिक्विंटलचा जाहीर झाला आहे. परंतु एवढा दर खानदेशात कुठेही नाही. कापसाची आवक बाजारात नगण्य आहे.

अनेकांनी मे व जूनमध्ये ६८०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल या दरात कापसाची विक्री टाळली होती. दरात सुधारणा होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु दरात सुधारणा झाली नाही. यामुळे हानी वाढली आहे. कापसाची आवक कमी असल्याने खेडा खरेदीदेखील वेगात किंवा जोमात नसल्याचे चित्र आहे.

जिनिंग उद्योगातील काम रखडत

खानदेशात काही अद्ययावत, आधुनिक जिनिंग प्रेसिंग कारखान्यांत कापसावर प्रक्रिया सुरू आहे. परंतु ही प्रक्रिया रखडत सुरू आहे. तसेच अनेक कारखान्यांत कापसाचा साठा नसल्याने कारखाने बंद आहेत.

खानदेशात २०२२-२३ मध्ये २२ लाख कापूसगाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्मिती अपेक्षित होती. परंतु सुमारे १७ लाख कापूसगाठींची निर्मिती झाली आहे. सध्या १५ कारखान्यांत प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT