Cotton Disease : चारशे एकर कपाशीवर लाल्या विकृतीचा प्रादुर्भाव

Reding of Cotton : नुकसान भरपाईसाठी खामगावच्या तहसीलदारांना निवेदन
Cotton Disease
Cotton DiseaseAgrowon
Published on
Updated on

Cotton Crop : खामगाव, जि. बुलडाणा ः जिल्ह्यात या हंगामात लागवड केलेल्या बीटी कपाशीच्या क्षेत्रात यंदा सुरुवातीपासूनच कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. शेकडो एकरांत कपाशीचे पीक लालसर होत असून वाढ खुंटल्याच्या घटना समोर येत आहेत. एकट्या खामगाव तालुक्यात हिवरखेड परिसरातील ४०० एकरांतील कापूस पिकात ही समस्या उद्भवली आहे. यासंबंधीचे निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहे. तसेच याबाबत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही केली आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झालेल्या बीटी कपाशीची उगवण झाली. मात्र, आता या झाडांवरील पाने लालसर होऊन वाढ खुंटली आहे. असा प्रकार सुरुवातीला नांदुरा तालुक्यात समोर आला होता. त्यानंतर मोताळा, जळगाव जामोद व आता खामगाव तालुक्यांत अशीच प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.

या प्रकारामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहेत. कपाशीचे झाड नेमके कशामुळे लालसर पडत आहे व वाढ खुंटली याचे निश्चित कारण स्पष्ट होऊ शकले नाही. खामगाव तालुक्‍यातील हिवरखेड येथे शेतकऱ्यांनी जवळपास ४०० एकर कपाशीवर लाल्‍या विकृतीची समस्या उद्भवल्याने पिकात शेळ्या, मेंढ्यांना चरण्यासाठी सोडल्याचा प्रकार समोर आला.

Cotton Disease
Cotton Disease : कपाशीवर अल्टरनेरिया बुरशी

याबाबत तहसीलदारांना निवेदन देत आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे. तसेच या समस्येमागे बियाणे कंपनी, विक्रेते असल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अंबादास पाटील, जिल्हा सचिव महादेव पाटील, शेतकरी पांडुरंग जानोकार, गोविंदा राऊत, विनोद खंडारे, शुभम राऊत, पिंटू देशमुख, शिरू भगत, सारंग भारसाकडे उपस्‍थित होते.

असे झाले नुकसान (आकड्यांमध्ये)

हिवरखेड येथील शेतकरी सुधाकर हटकर ५, रवींद्र हटकर ९, बंडू ठोंबरे ४, दिनकर खंडारे ८, राजू फुंडकर ५, सागर फुंडकर, वासुदेव खंडारे १०, गजानन हटकर ५, प्रवीण हटकर ५, भारत हटकर ९, समाधान खंडाळे २, शत्रुघ्न खंडाळे २, गोपाळ फुंडकर ९, वैजनाथ पारस्‍कर ६, हरी भाटिया ६, महादेव राऊत ५, संतोष देशमुख ५, महेंद्र हटकर ८, विजय हटकर ४, बाळू भगवारे २, मधू ठोंबरे २, मनोहर हटकर २, गोपाळ देशमुख ३, महादेव खंडारे ४, गणेश खंडारे १०, माणिक पारखे यांचा ७ एकर कपाशीचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com