Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Procurement : विदर्भातील ३४ केंद्रांवर ‘सीसीआय’ची कापूस खरेदी सुरू

Cotton Market Update : कापूस खरेदीसाठी केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून काम करणाऱ्या ‘सीसीआय’ने या हंगामातील कापूस खरेदी सुरू केली आहे.

Team Agrowon

Akola News : कापूस खरेदीसाठी केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून काम करणाऱ्या ‘सीसीआय’ने या हंगामातील कापूस खरेदी सुरू केली आहे. सीसीआयच्या अकोला विभागांतर्गत विदर्भातील ३४ केंद्रांवर हमीभावाने कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे.

कापसाला केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावापेक्षा बाजारात कमी भाव मिळाल्यास हमीभावाने शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला जातो. सध्या सर्वच मार्केट यार्डात कापसाला हमीभावाच्या तुलनेत जादा दर असल्याचा अंदाज आहे.

त्यामुळे सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरू केले असले तरी शेतकऱ्यांकडून अद्याप हमीभाव केंद्रावर कापूस आलेला नाही.

मात्र, हमी भावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी बाजारात झाल्यास सीसीआयच्या विदर्भातील सर्व ३४ केंद्रांवर हमी भावाने कापूस खरेदीसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यामुळे सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरू केले असले तरी शेतकऱ्यांकडून अद्याप हमीभाव केंद्रावर कापूस आलेला नाही. मात्र, हमी भावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी बाजारात झाल्यास सीसीआयच्या विदर्भातील सर्व ३४ केंद्रांवर हमी भावाने कापूस खरेदीसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.

विदर्भातील सीसीआयचे खरेदी केंद्र

अकोला जिल्हा : अकोट-ए, अकोट-बी, बार्शीटाकळी, चिखलगाव, हिवरखेड, मूर्तिजापूर, पारस अमरावती : धामणगाव, येवदा, चिखली, खामगाव-ए, खामगाव -बी, मलकापूर, नांदुरा चंद्रपूर : भद्रावती, राजुरा, सोनुर्ली नागपूर : कळमेश्वर, नरखेड, आर्वी, देवळी, हिंगणघाट वर्धा ः सेलू, सिंधी रेल्वे, वायगाव वाशीम : अनसिंग, मंगरूळपीर यवतमाळ : दारव्हा, खैरी, पांढरकवडा, राळेगाव, सिंदोळा, वणी, घाटंजी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT