Cotton Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market: कापूस दरात काहीशी सुधारणा; कापूस लागवड १२ टक्क्यांनी पिछाडीवर

Cotton Sowing : देशातील कापूस बाजारावर मागील तीन महिन्यांपासून दबाव आहे. यामुळे कापूस उत्पादक अडचणीत आले. शेतकऱ्यांना जुलै महिना निम्मा संपला तरी हंगामातील निचांकी भाव मिळत आहे.

Team Agrowon

Pune News : देशातील कापूस बाजारावर मागील तीन महिन्यांपासून दबाव आहे. यामुळे कापूस उत्पादक अडचणीत आले. शेतकऱ्यांना जुलै महिना निम्मा संपला तरी हंगामातील निचांकी भाव मिळत आहे.

परिणामी काही शेतकऱ्यांनी चालू खरिपात कापूस लागवडीला नापसंती दिल्याचं दिसतं. आतापर्यंत देशातील कापूस लागवड काही प्रमाणात कमी दिसते. पण आज आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात कापूस दरात काहीशी सुधारणा दिसून आली.

देशातील बाजारात आज कापसाच्या भावात क्विंटलमागं १०० रुपयांची सुधारणा दिसून आली. अनेक बाजारांमध्ये कापूस दर आज किंचित वाढलेले दिसले. आज कापसाची सरासरी दरपातळी ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होती.

तर दुसरीकडे बाजारातील कापूस आवक काहीशी कमी झाली, पण सरासरीपेक्षा जास्तच होती. आज देशातील बाजारात जवळपास २५ हजार गाठींच्या दरम्यान कापूस आल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. कापसाची आवक अधिक असल्यानेही कापूस दरवाढीवर दबाव येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

बाजार समित्यांबरोबरच वायद्यांमध्येही कापसाचे भाव वाढले होते. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा दिसून आली. इंटरकाॅन्टीनेन्टल एक्सचेंजवर आज दुपारी कापूस वायद्यांमध्ये एक टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली होती.

कापूस वायद्यांनी ८३ सेंटचा टप्पा गाठला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांनी अनेक सत्रांनंतर हा टप्पा गाठला होता. देशातही कापसाचे वायदे आज सुधारलेले पाहयला मिळाले. कापसाचे वायदे आज १८० रुपयांनी वाढले होते. तर दुपारपर्यंत कापूस वायद्यांनी ५६ हजार ९४० रुपयांचा टप्पा गाठला होता.

ऐन लागवडीच्या काळात कापसाचे भाव दबावात आल्याने लागवडीवरही परिणाम दिसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आतापर्यंतच्या लागवडीचा विचार करता लागवड क्षेत्र १२ टक्क्यांनी पिछाडीवर दिसते. देशात आतापर्यंत ९६ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली.

गेल्या हंगामात याच काळातील लागवड १०९ लाख हेक्टरवर होते. तसेच यंदा देशातील पाऊसमानावर एल निनोचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील कापूस लागवडीतील घट कायम राहिली आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा आधार मिळाल्यास देशातील कापूस बाजारातील चित्रही बदलू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT