Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापसाची आवक अल्प; दर नीचांकी स्थितीत

Cotton Rate : खानदेशात कापसाची आवक कमी आहे. एक ते दीड हजार क्विंटल कापूस बाजारात येत असून, खेडा खरेदी दर नीचांकी स्थितीत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कापसाची आवक कमी आहे. एक ते दीड हजार क्विंटल कापूस बाजारात येत असून, खेडा खरेदी दर नीचांकी स्थितीत आहेत.

सध्या खंडीसह (३५६ किलोची एक खंडी) सरकीचे दर घटल्याचे कारण खरेदीदार सांगत आहेत. सरकी दरात सुधारणा झाली, पण ही सुधारणा टिकत नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कापसाचे दर खानदेशात दबावातच किंवा अपेक्षित नसल्याची स्थिती आहे.

खानदेशात कापसाची बाजार समित्यांत कुठलीही आवक होत नाही. कमाल कापसाची थेट किंवा खेडा खरेदी केली जाते. खेडा खरेदीत सध्या दर्जेदार कापसाला ६४०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. कमी दर्जाच्या कापसाचे दर खानदेशात ५००० रुपये प्रतिक्विंटल, असे खेडा खरेदीत आहेत.

दरात मागील काही दिवसांत एक हजार रुपयांची घट झाली आहे. कापसाची आवक महिनाभरात वाढण्याचा अंदाज आहे. १५ ते २० दिवसांपूर्वी खानदेशात रोज ४०० ते ५०० क्विंटल कापसाची आवक होत होती. त्यात मागील काही दिवसांत सतत वाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT