Chana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Rate : हरभऱ्याचे भाव नरमले

Chana Market : हरभऱ्याच्या भावात फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये काहीशी नरमाई आली.

Team Agrowon

Pune News : हरभऱ्याच्या भावात फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये काहीशी नरमाई आली. केंद्र सरकारची ६० रुपये किलोने डाळ विक्री, पिवळ्या वाटाण्याची मुक्त आयात आणि नव्या हरभऱ्याची बाजारातील आवक, या कारणांमुळे हरभऱ्याच्या भावात नरमाई आली आहे.

केंद्र सरकारने यंदा हरभऱ्यासाठी ५ हजार ४४० रुपये हमीभाव जाहीर केला. पण सध्या देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये भावपातळी सध्या हमीभावाच्या दरम्यान किंवा त्यापेक्षा कमी होती. मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारांमधील सरासरी हरभरा भाव हमीभावापेक्षा कमी होता.

मध्य प्रदेशातील हरभरा आवक जास्त असलेल्या बाजारांमध्ये सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर राजस्थानमधील ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये आणि महाराष्ट्रात ५ हजार १०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशभरातील बाजाराचा विचार करता सध्या काही बाजारात हरभरा हमीभावाच्या दरम्यान आहे. तर काही बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे.

देशातील हरभऱ्याची काढणी जवळपास पूर्ण झाली. त्यामुळे होळीनंतर बाजारातील आवक वाढण्याची शक्यता आहे. हरभऱ्याला मागणी चांगली आहे. पण पिवळा वाटाणा आयातही वाढत आहे. त्यामुळे हरभऱ्याला स्वस्त पर्याय उपलब्ध असून मागणी काहीशी कमी होत आहे. नवा माल बाजारात वाढत असल्याने दरावर काहीसा दबाव आला.

पिवळा वाटाणा आयातीचा दबाव

देशातील डाळींचे भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ८ डिसेंबर २०२३ रोजी पिवळा वाटाणा आयात ३० एप्रिलपर्यंत खुली केली. त्यामुळे आयात मोठ्या प्रमाणात वाढली. फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत देशात तब्बल ६ लाख टन पिवळा वाटाणा आयात झाला. तर ३० एप्रिलपर्यंत ही आयात १५ लाख टनांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आयातदार व्यक्त करत आहेत. पिवळा वाटाणा आयात वाढल्याचा दबाव हरभरा भावावर येत आहे.

सरकारने देशात डाळींचा पुरवठा वाढावा यासाठी पिवळा वाटाणा आयात खुली केली. त्यामुळे आयात वाढली. परिणामी, हरभरा डाळीचे भावही कमी झाले. भारतात प्रामुख्याने रशिया आणि कॅनडातून पिवळा वाटाणा आयात होत असते.
- राहुल चौहान, संचालक, आयग्रेन इंडिया

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT