Chana Market News Updates Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Market : देशात हरभऱ्याचे दर दबावात

Team Agrowon

Pune News : देशातील बाजारात सध्या हरभरा भाव दबावात आहेत. ‘नाफेड’ने २३ लाख २१ हजार टनांची खरेदी केली. यापैकी मध्य प्रेदश आणि महाराष्ट्रातच १६ लाख टनांची खरेदी झाली. बाजारातील हरभरा आवक सध्या कमी झाली. पण सरकारच्या दबावामुळे हरभरा दर वाढताना दिसत नाही. तूर आणि उडदाचे भाव तेजीत असल्याने हरभऱ्याचा वापर वाढविण्याचा सरकारचा विचार असल्याचे जाणकारांनी सांगितले.

देशात यंदा १३५ लाख टन हरभरा उत्पादन झाल्याचे केंद्र सरकारने सांगितले. यापैकी ‘नाफेड’ने आतापर्यंत २३ लाख २१ हजार टनांची खरेदी केली. मागील हंगामातही केंद्राने २६ लाख टन हरभरा खरेदी केला होता. गेल्यावर्षीची खेरदी विक्रमी होती. त्यानंतर यंदाचा आकडा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आहे.

यंदा मध्य प्रदेशात सर्वाधिक ७ लाख ९७ हजार टन हरभरा ‘नाफेड’ने खरेदी केला. त्यानंतर महाराष्ट्रात ७ लाख ७३ हजार टन आणि गुजरातमध्ये ३ लाख २८ हजार टनांवर खरेदी झाली. उर्वरित खरेदी तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात झाली.

केंद्र सरकारने यंदा एकूण उत्पादनापैकी १७ टक्के हरभरा खरेदी केला. पण तरीही खुल्या बाजारात हरभरा भाव दबावातच आहेत. हरभऱ्याला आताही ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. हरभरा भावाला ‘नाफेड’च्या खरेदीचा आधार मिळाला नाही. ‘नाफेड’ची खेरदी वाढल्यानंतर हरभरा भाव वाढणे अपेक्षित होते.

पण उलट ‘नाफेड’च्या खरेदीचा बाजारावर दबाव आला. कारण ‘नाफेड’ स्टॉकमधील हरभरा पुढील काही काळात बाजारात आणायची शक्यता आहे. हा हरभरा सध्याच्या बाजारभावावरच बाजारात येऊ शकतो, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे बाजाराला आधार मिळाला नाही.

‘नाफेड’कडे ३८ लाख टन साठा

दुसरीकडे तूर आणि उडदाचे भाव तेजीत आहेत. सरकारने देशातील उत्पादन आणि स्टॉकची माहिती घेण्यासाठी समिती स्थापन केली. स्टॉक लिमिटही लावले. पण तरीही भाव कमी झाले नाही. त्यामुळे सरकार हरभरा डाळीचा वापर वाढविण्याच्या तयारीत आहे.

कारण सध्या ‘नाफेड’कडे जवळपास ३८ लाख टन हरभरा स्टॉक आहे. तसेच उत्पादनही चांगले आहे. हरभरा भाव कमी असल्यास तूर आणि उडदाऐवजी ग्राहक हरभऱ्याचा वापर वाढवू शकतात. जास्तीत जास्त मागणी हरभऱ्याकडे वळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकार हरभरा बाजार दबावातच ठेवण्याच प्रयत्न करत आहे, असे जाणकारांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT