Maharashtra Land Surveyor Jobs: जमीन मोजणीसाठी ५ हजार परवानाधारक खासगी सर्वेअर (लायसन्सी सर्वेअर) घेणार आहोत. यासाठी आयटी, इंजिनिअर शिक्षण घेतलेल्यांना संधी मिळेल. त्यांना महिना ३५ हजार रुपये मिळतील. त्यांना आम्ही रोव्हर, ड्रोन कसे चालवायचे? याचे १५ दिवसांचे प्रशिक्षण देऊ. त्यांना महिन्याला २० मोजणी कराव्या लागतील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली..ते आज (दि.३१ ऑक्टोबर) नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकारची भूमिका आहे की, जमीन मोजणीचा अर्ज आल्यानंतर १५ दिवसांत मोजणी झाली पाहिजे. त्यासाठी परवानाधारक खासगी सर्वेअर आम्ही घेणार आहोत. आता १,२०० सर्वेअर आहेत. आणखी ५ हजार सर्वेअर घेतल्यानंतर १५ दिवसांत मोजणी करण्याचा आमचा संकल्प पूर्ण होईल. महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. .Land Surveyor Salary: भूकरमापकांसाठी आनंदाची बातमी! सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा सरकारचा निर्णय.भूमी अभिलेख विभागातील १०६ अधिकाऱ्यांना पदोन्नतीतसेच महसूलच्या भूमी अभिलेख विभागातील १०६ मोजणी अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व सोमवारी रुजू होतील. यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील रिक्त पदे भरण्यास प्राधान्य दिले आहे, असे बावनकुळे म्हणाले. .Digital Mapping: शेत-पाणंद रस्त्यांचे ‘डिजिटल मॅपिंग’.नियमित मोजणी ९० दिवसांत आणि जलद मोजणी ३० दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच खासगी सर्वेअरची नियुक्ती आणि जमीन मोजणीचा कालावधी कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पुढच्या काही काळात केवळ १५ दिवसांत जमीन मोजणी होईल, यासाठी सरकारने पावले उचलली आहे. .दुष्काळावर उपाययोजना सुरु असल्याची माहितीही महसूलमंत्र्यांनी दिली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन सुरु आहे. दुष्काळावर करावयाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. त्याचा आम्ही आढावा घेत आहेत. दुष्काळाच्या परिस्थितीत नागपूर जिल्ह्यात परिस्थिती स्थिर राहावी यासाठी जिल्हा नियोजन समितीचा १,४०० कोटींचा निधी दुष्काळाच्या उपाययोजनांवर खर्च करणार आहोत. यावर्षी सिमेंट रस्ते, सौंदर्यीकरणाचे काम थांबवून संपूर्ण निधी हा दुष्काळ, पाणी टंचाई, जलसंधारण, जलव्यवस्थापन, पुनर्भरण, शेतरस्ते यावर खर्च होईल, असेही त्यांनी सांगितले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.