Chana MSP : हमीभावातील हरभरा खरेदीचे उद्दिष्ट अपूर्ण

Chana Procurement : खरेदी गुंडाळली; नियोजनातील दिरंगाईमुळे उद्दिष्ट अपूर्ण
Chana MSP
Chana MSPAgrowon
Published on
Updated on

Akola Market News : यंदाच्या हंगामातील उत्पादित हरभरा हमीभावाने खरेदीसाठी १४ मार्चपासून राज्यात प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ही खरेदी ११ जूनपासून बंद झाली आहे. राज्यात ७७ लाख ३६ हजार ५०१ क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे.

राज्याला यंदा ८१ लाख क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. मात्र शासकीय यंत्रणांमधील नियोजनातील दिरंगाईमुळे हे उद्दिष्ट अपूर्ण राहिले आहे, अशी माहिती मिळाली.

काही जिल्ह्यांत शेतकऱ्यांकडे हरभरा असूनही वेळेअभावी तो खरेदी होऊ शकलेला नाही. ५३३५ रुपयांच्या हमीभावाने यंदा १४ जूनपासून हरभरा खरेदी सुरू झाली होती.

विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, मार्कफेड, महाएफपीसी, पृथाशक्ती एफपीसी, वॅपको, महाकिसान व्ही, महाकिसान संघ, महास्वराज्य अशा राज्य एजन्सीमार्फत ६१० केंद्रांवर ही खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली.

या हंगामात उत्पादकतेवर आधारित लक्ष्यांक जिल्हानिहाय विभागून देण्यात आला होता. याचा फटका हरभरा उत्पादक प्रमुख जिल्ह्यांना जास्त प्रमाणात बसला.

Chana MSP
Chana MSP : हमीभावातील हरभरा खरेदीचे उरले केवळ दोन दिवस

अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती आदी जिल्ह्यांत रब्बीत हरभऱ्याचे प्रमुख पीक घेतले जाते. लागवड क्षेत्र जास्त असल्याने खरेदीवर निर्बंध नसण्याची गरज होती. परंतु खरेदी प्रक्रिया सुरू करतानाच ही मर्यादा घातली. त्यामुळे स्थानिक यंत्रणांचीही अडचण झाली.

अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांचे लक्ष्य तर एप्रिलमध्येच पूर्ण झाले. बुलडाणा जिल्ह्यात १५ ते २० दिवस नवीन लक्षांक देण्याचा निर्णय यंत्रणेने घेतला. दरम्यान खरेदी ठप्प होती. वाढीव उद्दिष्टाच्या निर्णयानंतर खरेदी सुरु झाली. परिणामी, ऐन खरेदीच्या काळातील महत्त्वाचे दिवस वाया गेले.

इतर जिल्ह्यांतही अशा विलंबाचा फटका बसला. खरेदीला जेमतेम तीन-चार दिवस शिल्लक असताना खरेदी मर्यादा उठविण्यात आली.

Chana MSP
Chana Procurement : हमीभावातील हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढले

एकसमान सूत्राचा फटका
वास्तविक ज्या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अधिक नोंदणी केली, जेथे क्षेत्र जास्त असल्याने उत्पादन अधिक झालेले आहे,

अशा जिल्ह्यांबाबत सुरुवातीपासून वेगळ्या धोरणाची गरज होती. परंतु सर्व जिल्ह्यांना एकसमान सूत्रात बांधल्याने फटका बसला.

सुमारे एक लाख ९० हजार शेतकरी हमीभावापासून वंचित
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात हरभरा विक्रीसाठी यंदा ५ लाख ८१ हजार ७९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन लाख ९२ हजार ७६८ शेतकऱ्यांचा ७७ लाख ३६ हजार ५०१ क्विंटल हरभरा खरेदी झाला.

सुमारे एक लाख ९० हजार शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी झालेला नाही. यापैकी अनेकांनी शासकीय खरेदीत होत असलेली दिरंगाई पाहून खुल्या बाजारात कमी दराने हरभरा विक्री केला. काहींना उशिराने एसएमएस मिळाले, तोपर्यंत त्यांचा हरभरा विकून झाला होता.

खरेदीची आकडेवारी
एकूण खरेदी - ७७ लाख ३६ हजार ५०१ क्विंटल
शेतकरी संख्या - तीन लाख ९२ हजार ७६८
एकूण नोंदणी - ५ लाख ८२ हजार ८३३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com