Chana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Procurement : यंदा हरभरा गाठणार खरेदीचा उच्चांक

रब्बी हंगामातील हरभरा पिकाची हमीभावाने (एमएसपी) खरेदी सध्या सुरू आहे.

Team Agrowon

Chana Market Update : नवी दिल्ली (एएनआय) : रब्बी हंगामातील हरभरा पिकाची हमीभावाने (Chana MSP) (एमएसपी) खरेदी सध्या सुरू आहे. या वर्षी हरभरा खरेदी (Chana Procurement) नवीन उच्चांकावर जाण्याचा अंदाज ‘ग्लोबल पल्स कॉन्फेडरेशन’च्या (जीपीसी) अहवालात वर्तविण्यात आला आहे.

हरभरा या रब्बी पिकाची पेरणी मुख्यतः ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये केली जाते. तर पीक जानेवारी ते मार्च दरम्यान काढणीवर येते. ‘नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ (नाफेड) ने आतापर्यंत १० लाख टन हरभरा खरेदी केला आहे. कृषी बाजार तज्ज्ञ आणि ‘ॲगपल्स ॲनॅलिटिका’चे गौरव जैन यांनी ‘जीपीसी’च्या अहवालात ही माहिती दिली आहे.

‘जीपीसी’च्या अहवालानुसार, हरभरा खरेदी मागील वर्षापासून सुमारे १४ लाख (१.४ दशलक्ष) टन मागील साठ्यासह सुरू झाली आणि एकूण साठा स्थिती २५ लाख (२.५ दशलक्ष) टनांच्या जवळ गेली.

गेल्या वर्षी ‘नाफेड’ने शेतकऱ्यांकडून २६ लाख (२.६ दशलक्ष) टन हरभरा खरेदी केला होता. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील दोन प्रमुख उत्पादकांनी, शेतकऱ्यांनी अनुक्रमे पाच लाख, ५ लाख टन आणि २ लाख ११ हजार टन हरभरा विकला आहे. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटलला ५ हजार ३३५ रुपये हमीभाव आहे.

हरभरा साठा ३५ लाख टनांवर जाण्याचा अंदाज

पुढील काळात हरभरा साठा मागील साठ्यासह ३४ ते ३५ लाख (३.५-४ दशलक्ष) टनांवर जाण्याचा अंदाज अहवालात वर्तविण्यात आला आहे. ‘नाफेड’ देशांतर्गत डाळींच्या बाजारात विक्रीचा दबाव ठेवण्याची शक्यता आहे.

‘नाफेड’ हरभऱ्याचा साठा बाजारात आणेल. हरभऱ्याच्या किमती कमी होतील. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचा साठा करण्यापासून परावृत्त करावे, असे मत जैन यांनी या अहवालात मांडले आहे.

हरभरा किमती कमी राहण्याचा अंदाज

मागील वर्षी जेव्हा ‘नाफेड’ची खरेदी आणि साठा जास्त होता, तेव्हाचे उदाहरण देऊन अहवालात म्हटले आहे की, उर्वरित वर्षभर हरभऱ्याच्या किमती कमी राहिल्या. यंदाचे वर्ष ही त्यास अपवाद असण्याची शक्यता नाही, असे भाकीत केले आहे. सुरुवातीचा कलानुसार देशातील हरभऱ्याच्या किमती किरकोळ स्वरूपात कमी होण्यास सुरुवात झाली आहे, असेही पुढे अहवालात स्पष्ट केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT