Sugar Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

Sugar Sale : साखर कारखान्यांनी दिलेल्या कोट्यापेक्षा जादा साखर विकल्याने केंद्राने मे महिन्याचा ६५ कारखान्यांचा कोटा कमी केला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : साखर कारखान्यांनी दिलेल्या कोट्यापेक्षा जादा साखर विकल्याने केंद्राने मे महिन्याचा ६५ कारखान्यांचा कोटा कमी केला आहे. पात्र कोट्याच्या २५ टक्के साखर कमी देऊन केंद्राने या कारखान्यावर साखर कोटा कपातीची कारवाई केली आहे.

गेल्याच महिन्यात कारखान्यांनी जे साखर कारखाने दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त साखर विक्री करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. कारखान्यांनी मखलाशी करताना विक्री केलेले साखर कोटे ऑनलाइन पोर्टलवर भरण्यास टाळाटाळ केली होती. केंद्राच्या लक्षात आल्यानंतर केंद्राने याबाबत कडक सूचना केल्या होत्या.

यानंतर मे महिन्यासाठी कोटे जाहीर करताना ज्या साखर कारखान्यांनी फेब्रुवारी महिन्यात दिलेल्या कोट्यापेक्षा अतिरिक्त साखर विक्री केली आहे त्या कारखान्यावर कोटे घटवण्याची कारवाई केली. यामुळे ऐन उन्हाळ्याची मागणी असतानाही कारखान्यांना अपेक्षित साखर विक्री करता येणार नाही.

जूनच्या कोट्यावरही टांगती तलवार

केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने साखर कारखान्यांनी एप्रिलमध्ये विक्री केलेल्या साखरेची माहिती १० मे पर्यंत नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम या पोर्टलवर भरावी. याच बरोबर बी-हेवी, शुगर सिरप, उसाचा रस यापासूनचे इथेनॉलचे उत्पादन देखील या पोर्टलवर भरण्याची सक्त सूचना पुन्हा एकदा केली आहे.

ही माहिती जर कारखान्यांनी लपवली तर जूनमध्ये देण्यात येणाऱ्या साखर कोट्याबाबत ही केंद्र कडक भूमिका घेईल, असा इशारा देण्यात आला आहे. ज्यूट पॅकिंगबाबतही कारखान्यांनी माहिती द्यावी या वेळी असेही केंद्राने सांगितले आहे. कारखान्यांनी ज्यूट पॅकिंगमध्ये साखर तयार करण्याचे टाळल्याने अशा कारखान्यावरही केंद्र कारवाई करू शकते, असे केंद्रीय अन्न व सार्वजनिक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गहू बाजारात चढ-उतार, झेंडू बाजारात तेजीत, टोमॅटो बाजारात चढ-उतार , केळी बाजारात तेजी, डाळिंब आवकेत घट

Lift Irrigation : उपसा सिंचनच्या पाणीवापरासाठीचे दर निश्चित

Manoj Jarange Patil Protest: मी मुंबईला एकटाच निघणार, योग्यवेळी तुम्हाला बोलवेन; मनोज जरांगेंचा निर्णय

Water Crisis Management : संभाव्य टंचाईसाठी काटेकोर तयारी करा

Rain Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पुढील ५ दिवसांचा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT