Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

Sugarcane Season : सांगली जिल्ह्यातील २०२३-२४ चा ऊस गाळप हंगाम संपला आहे. सतरा कारखान्यांनी ८८ लाख ८३ हजार टन उसाचे गाळप करून एक कोटी ४१ लाख ८८६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यातील २०२३-२४ चा ऊस गाळप हंगाम संपला आहे. सतरा कारखान्यांनी ८८ लाख ८३ हजार टन उसाचे गाळप करून एक कोटी ४१ लाख ८८६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी उतारा ११.३० टक्के आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे उत्पादन वाढीस मदत झाली असल्याचे साखर कारखान्यांनी सांगितले. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा साखरेच्या उत्पादनात सात लाख २१ हजार ५१३ क्विंटलने वाढ झाली आहे.

गतवर्षीच्या म्हणजे २०२२-२३ या गाळप हंगामात १० सहकारी व ५ खासगी अशा पंधरा कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. १ लाख २४ हजार हेक्टरवरील उसाचे गाळप केले. या कालावधीत ८२ लाख ५५ हजार २७५ टन उसाचे गाळप करून ९३ लाख २० हजार ३७३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. या हंगामात ११.९१ टक्के सरासरी साखर उतारा होता.

Sugar Production
Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

जिल्ह्यात १९ साखर कारखाने आहेत. यंदाच्या हंगामात १० सहकारी व ७ खासगी कारखान्यांनी हंगाम सुरू केला. आटपाडीतील माणगंगा व कवठेमहांकाळ येथील महांकाली कारखान्याने हंगाम घेतला नाही. उर्वरित १७ कारखान्यांनी हंगाम सुरू केला. ऊस उत्पादकांचे आंदोलन, ऊसटंचाईवर मात करीत कारखान्यांनी हंगाम यशस्वी पूर्ण केला. कारखान्यांचा हंगाम सध्या बंद झाला आहे. जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी ८८ लाख ८३ हजार टन उसाचे गाळप करून एक कोटी ४१ लाख ८८६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले.

२०२३-२४ या वर्षात अपुरा पाऊस, पाण्याची कमतरता यामुळे साखरेचे उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त कारखानदारांनी व्यक्त केला होता. मात्र, शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन केले. तसेच नोव्हेंबरमध्ये परतीचा पाऊस झाला. या पावसाचा फायदा उत्पादन वाढीसाठी झाला. तसेच जिल्ह्यातील कारखान्यांनी कोल्हापूर, सातारा, सोलापूर व कर्नाटक सीमेवरील ऊस गाळपासाठी आणला. त्यामुळे यंदाच्या हंगामात साखरेच्या उत्पादनात वाढ झाली. गत हंगामापेक्षा चालू हंगामात ७ लाख २१ हजार ५१३ क्विंटलने साखरेचे उत्पादन वाढले.

Sugar Production
Sugar Production : देशात ३१८ लाख टन साखर उत्पादनाची शक्यता

राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या वाटेगाव युनिटने जिल्ह्यात सर्वाधिक १२.६२ टक्के साखर उतारा घेतला. सर्वांत कमी ८.५६ टक्के साखर उतारा एसजीए शुगर्सचा (तासगाव) आहे.

२०२१-२२ मध्ये एक कोटी क्विंटलहून अधिक उत्पादन

जिल्ह्यात २०२१-२२ या वर्षात उसाचे क्षेत्र गाळपासाठी वाढले होते. या हंगामात १३ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. पाच कारखाने बंद होते. तरीही एक कोटी क्विंटलपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन झाले होते. यानंतर २०२३-२४ या वर्षात उत्पादन वाढले.

कारखानानिहाय गाळप

कारखाना ऊस गाळप (लाख टनांत) साखर उत्पादन (लाख क्विंटल) उतारा टक्के

दत्त इंडिया, सांगली ८९३७०६ १०३३५५2० ११.४९

राजारामबापू पाटील, साखराळे ८५२६२९ १०१५१२० ११.८९

विश्वास नाईक, चिखली ५६९३६७ ६८६७०० १२.१८

हुतात्मा किसन अहिर, वाळवा ५२०७५० ६५६००० १२.३१

राजारामबापू पाटील, वाटेगाव ४८२३३४ ६११००० १२.६२

एसजीए, तासगाव १४२७९४ ११९१११ ८.५६

राजारामबापू पाटील, जत १८४७२० २०६०३० १०.३१

सोनहिरा, वांगी १०६२०९४ ११८९३०० १२.०३

क्रांती, कुंडल १०९२२९५ ११८६९८० ११.८९

राजारामबापू पाटील, कारंदवाडी ३९१२९९ ४९३८१० १२.५१

मोहनराव शिंदे, आरग २५४७८० २७००७० १०.५८

निनाईदेवी (दालमिया), कोकरुड ५२८९१२ ६४०९३५ ११.८९

यशवंत शुगर, नागेवाडी १३७१३३ १५०१७५ १०.७४

केन अॅग्रो, डोंगराई २३१००० २२४०७० १०.२८

उदगिरी शुगर, बामणी ६३७८१६ ६९१००० १०.८२

सद्‌गुरू श्री श्री राजेवाडी ६००९४६ ५४३१८५ ९.२९

श्रीपती शुगर, डफळापूर ३००६७० ३२४८५० १०.७१

एकूण ८८,८३,२४५ १००४१८८६ ११.३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com