Sugar Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Brazil Sugar Production : ब्राझीलच्या साखर उत्पादनात वाढ कायम

Sugar Market Update : ब्राझीलच्या साखर उत्पादनात वाढ कायम आहे. विशेष करून दक्षिण मध्य भागात उत्पादन वाढत असल्याची स्थिती आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : ब्राझीलच्या साखर उत्पादनात वाढ कायम आहे. विशेष करून दक्षिण मध्य भागात उत्पादन वाढत असल्याची स्थिती आहे. या भागातील साखर उत्पादन जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ८.९ टक्क्यांनी म्हणचे ३० लाख टनांनी वाढले आहे. युनिका संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे.

या कालावधीत ४८० लाख टन उसाचे गाळप करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ टक्क्यांनी गाळप वाढले आहे. इथेनॅालचे उत्पादन २.२६ अब्ज टन झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेच ते १.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सध्या आंतराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर चांगले असल्याने याचा फायदा उठविण्यासाठी ब्राझील साखरेचे उत्पादन जादा प्रमाणात करत आहे. यंदा ब्राझीलमध्ये पहिल्यापासूनच साखरेच्या उत्पादनात वाढ होत आहे.

एप्रिलमध्ये यंदाचा हंगाम सुरू झाला. पहिल्या पंधरवड्यातच साखरेच्या उत्पादनात वाढ झाली. तोच ट्रेंड यंदाही कायम आहे. गेली दोन वर्षे विविध कारणांमुळे पिछाडीवर पडलेल्या ब्राझीलने यंदा जाणीवपूर्वक साखर उत्पादनात वाढ केली.

हंगाम सुरू होण्यापूर्वी निसर्गानेही त्यांना साथ दिली. यामुळे पहिल्या महिन्यापासूनच साखरेचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे साखरेच्या बरोबरच इथेनॅालचे उत्पादन करत ब्राझीलने साखर व इथेनॅालच्या उत्पादनात संतुलन ठेवले आहे. सध्या इथेनॅालला ब्राझीलमध्ये देशांतर्गत बाजारात मागणी वाढली आहे. याचा फायदाही त्यांना होत आहे.

यंदा साखरेचे उत्पादन वाढले असले तरी जागतिक बाजारात साखरेला सातत्याने मागणी आहे. यामुळे ब्राझीलची साखर उच्चांकी किमतीने विकली जाणार आहे. गेल्या दोन वर्षांत तेथील साखर उद्योगात आलेली मंदी यंदा तेजीत बदलेल, अशी शक्यता आहे. यंदा साखर कारखान्यांना चांगला ऊस मिळत असून कारखन्यांचे साखरेचे उत्पादनही समाधानकारक वाढत असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

देशांतर्गत साखर उपलब्धतेचे आव्हान

पुढील हंगामात जगातून किती साखर उत्पादन होईल याबाबत अद्याप कुठेच एकवाक्यता दिसत नाही. भारत, थायलंड या प्रमुख देशांना देशांतर्गत बाजारातच साखर उपलब्ध करून देण्याचे आव्हान आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात या देशांची साखर जागतिक बाजारात येऊ शकणार नाही, असे साखर उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT