Sugar Production : थायलंड, चीनमध्येही साखर उत्पादन घटण्याचा धोका

Sugar Market Update : यंदाच्या वर्षात भारताबरोबरच ब्राझीलनंतर आघाडीवर असणाऱ्या थायलंड, चीनमध्येही साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाल्याने जागतिक बाजारात साखरेची चणचण भासण्याची शक्यता आहे.
Sugar Production
Sugar Production Agrowon

Kolhapur News : यंदाच्या वर्षात भारताबरोबरच ब्राझीलनंतर आघाडीवर असणाऱ्या थायलंड, चीनमध्येही साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाल्याने जागतिक बाजारात साखरेची चणचण भासण्याची शक्यता आहे. यंदा जागतिक बाजारात जादा प्रमाणात केवळ ब्राझीलचीच साखर राहील, अशी शक्यता आहे. जागतिक बाजारात ब्राझील, भारतानंतर या देशांचा क्रमांक आहे.

भारतात गेल्या हंगामात साखरेचे अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन झाले. यंदाही कमी उत्पादनाचेच सावट असल्याने केंद्र येत्या हंगामात निर्यातीला प्राधान्य देण्याची शक्यता कमी आहे. या पाठोपाठ थायलंड आणि चीनमध्येही ऊस उत्पादनासह साखर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.

Sugar Production
Sugar Production : साखर उत्पादनात उत्तर प्रदेश बनला नंबर वन

थायलंडमध्ये तर उत्पादन तब्बल २१ टक्के घटेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. हवामान बदलाचा फटका आघाडीच्या देशांना बसत असून याचा नकारात्मक परिणाम साखर उत्पादनावर होणार हे निश्चित आहे.

या पार्श्‍वभूमीवर जागतिक साखर बाजारातही किमतीत अपवाद वगळता तेजी कायम आहे. महिन्यापूर्वी ब्राझीलची साखर बाजारात येणार हे गृहीत धरून काही प्रमाणात जागतिक बाजारातही साखरेचे दर काही प्रमाणात खाली आले होते.

पण मोठ्या प्रमाणात घसरण झाली नव्हती. ६५० डॉलर प्रति टनांपर्यंत दरात घसरण झाली. पण त्‍यानंतर प्रतिकूल हवामानामुळे भारतात तसेच थायलंड, चीनमध्येही साखर उत्पादन कमी होणार याबाबत चर्चा सुरू झाल्या. अनेक संस्थांनीही याला दुजोरा दिल्‍याने जगातील या आघाडीच्या देशांमध्ये साखर उत्पादन घटणार असल्याचा अंदाज आला.

Sugar Production
Sugar Production : देशात ३३० ते ३३८ लाख टन साखर निर्मिती शक्‍य

यातच जुलैच्या पुर्वार्धात ब्राझीलच्या साखर उत्पादनाची गती काही प्रमाणात मंदावली. याचा एकत्रीत परिणाम साखरेचे दर हळूहळू वाढण्यावर झाला. गुरुवारी (ता. २०) हे दर ६७५ डॉलर प्रति टनांपर्यंत वाढले.

२०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षांत एकट्या भारताचीच तब्ब्ल १७० लाख टनांपर्यंतची साखर विविध देशांनी विकत घेतली होती. या देशांना येत्या हंगामात अन्य देशांकडे जावे लागेल. यातच थायलंड, चीनमध्येही कमी उत्पादनाची शक्यता असल्‍याने हे देशही स्वतःची गरज भागवूनच साखरेची विक्री करतील, असा अंदाज आहे.

ब्राझीलमध्ये ३८० लाख टन उत्पादन

जगात प्रत्‍येक वर्षी साखरेचे उत्पादन १३०० ते १४०० लाख टन होते. यामध्ये यातील निम्मे उत्पादन आशिया खंडात होते. सर्वाधिक साखर निर्मितीत ब्राझील, भारत, थायलंड, चीन आदी देश आघाडीवर असतात. २०२२-२३ मध्ये ब्राझीलमध्ये ३८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले.

त्या खालोखाल भारतात ३३० लाख टन, युरोपियन देशात १४०, थायलंड ११०, चीन ९०, अमेरिका ८०, रशिया ७०, पाकिस्तान ६०, मेक्सिको ४० तर आस्‍ट्रेलियात ४० लाख टन उत्पादन झाले. येणाऱ्या हंगामात केवळ ब्राझील वगळता अन्य ठिकाणी मात्र साखर उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्‍त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com