Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market Rate : ब्राझीलची सोयाबीन उत्पादकता ३२ क्विंटल; ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाच्या अंदाज पुन्हा कपात

International Soybean Market : ब्राझीलमधून महत्वाच्या घडामोडी पुढे येत आहेत आणि याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजार आणि आपल्या सोयाबीन बाजारावर दिसून येत आहे.

Anil Jadhao 

Pune News : दुष्काळामुळे यंदा आपल्याला हेक्टरी उत्पादन उत्पादन खूपच घटलं. जगातील सर्वात मोठ्या सोयाबीन उत्पादक पण ब्राझीलची सोयाबीन उत्पादकता माहित आहे का?  ब्राझीलमधून महत्वाच्या घडामोडी पुढे येत आहेत आणि याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजार आणि आपल्या सोयाबीन बाजारावर दिसून येत आहे.

ब्राझीलमधील सोयाबीनची काढणी वेगाने सुरु आहे तर उत्पादनाचे अंदाजही कमी कमी केले जात आहेत. याचे थेट पडसाद आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसून येत आहे. 

आतापर्यंत ब्राझीलच्या ५५ टक्के पिकाची काढणी पर्ण झाली. त्यामुळे ब्राझीलची सोयाबीन उत्पादकता किती हे देखील स्पष्ट होत आहे. यंदा ब्राझीलची सोयाबीन उत्पादकता गेल्यावर्षीपेक्षा ७ टक्क्यांनी कमी झाली. तरीही ब्राझीलमध्ये यंदा ३२ क्विंटल ५३ किलो प्रतिहेक्टरी उत्पादकता आल्याचे सांगितले जाते.

म्हणजेच आपल्यापेक्षा कितीतरी जास्त. मागील आठवड्यापासून काही भागात काढणीचा वेग कमी झाला कारण काही ठिकाणी पाऊस झाला. तसेच काही भागात लागवड उशीरा झाली होती. त्यामुळेही काढणीला उशीर होत आहे. तरीही गेल्यावर्षीपेक्षा सोयाबीन काढणी वेगाने सुरु आहे. 

कोनाब या ब्राझीलच्या सरकारी संस्थेने आपल्या सोयाबीन उत्पादनाच्या अंदाजात कपात केली. कोनाबने फेब्रुवारीच्या आपल्या अहवालात ब्राझीलमध्ये १ हजार ४९४ लाख टन सोयाबीन उत्पादन होईल असा अंदाज दिला होता.

पण मार्च महिन्याच्या अंदाजात पावणेदोन टक्क्यांची कपात करून १ हजार ४६९ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज दिला. म्हणजेच गेल्यावर्षीपेक्षा उत्पादन ५ टक्क्यांनी कमी राहणार आहे. तरीही यंदाचे उत्पादन दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी उत्पादन असेल. 

ब्राझीलच्या सोयाबीन अंदाजावरून शेतकऱ्यांमध्ये बराच गोंधळ दिसतो. कारण प्रत्येक महिन्यात उत्पादनाबाबत दोन किंवा तीन अंदाज येत असतात. तर त्याचं असं आहे की, ब्राझीलच्या उत्पादनाचे अंदाज प्रामुख्याने दोन संस्था देत असतात.

कोनाब ही ब्राझीलची सरकारी संस्था आणि अमेरिकेचा कृषी विभाग म्हणजेच युएसडीए. याव्यतिरिक्त अॅगरुरल, काही कंन्सलटंट संस्था, रिसर्च संस्थाही अंदाज देत असतात. तसेच शेतकरी लाॅबीही आपला अंदाज देत असते.

हा कोनाबचा अंदाज होता. युएसडीएचा अंदाज अजूनही जास्तच आहे. युएसडीएने आपल्या मार्च महिन्याच्या अंदाजात १० लाख टनांनी कपात करून १ हजार ५५० लाख टनांचा अंदाज दिला. तर ब्राझीलच्या शेतकऱ्यांच्या मते, सोयाबीन उत्पादन या दोन्ही संस्थांच्या अंदाजापेक्षा कमीच आहे. ब्राझीलचे उत्पादनाचे अंदाज कमी झाले तरी अर्जेंटीनातील पीक चांगलं असल्याचं सांगितलं जातं.

त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारावर दबाव आहे. ब्राझीलमधील अनेक शेतकऱ्यांनीही भाव पडल्याने सोयाबीन मागे ठेवलं होते. पण मागच्या आठवड्यात सोयाबीनचा भाव आंतराराष्ट्रीय बाजारात काहीसा वाढल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्री पुन्हा सुरु केली. आंतरराष्ट्रीय बाजारात पुढील महिना दीड महिन्यात आणखी काहीशी सुधाराणा होण्याची शक्यता आहे. 

आपल्याकडंही आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि सरकारचं खाद्यतेल आयातीचं धोरण यामुळं बाजार दबावात आहे. सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT