Agriculture Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast: आल्याच्या भावात मोठी घसरण; हळद, केळी, कापूस तसेच काय आहे सोयाबीन भाव?

Daily Commodity Rates: आज आपण आले, हळद, केळी, सोयाबीन आणि कापूस पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

आल्याचे भाव पडले

आल्याचे भाव मागील दोन महिन्यांमध्येच मोठी नरमाई आली. आल्याचे भाव ९ हजारांवरून आता ३ हजारांच्या आता आले आहेत. बाजारात नव्या मालाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. यंदा लागवडीच्या काळात आल्याला चांगला भाव होता. त्यामुळे लागवड वाढल्याच शेतकऱ्यांनी सांगितले. परिणाणी यंदा आल्याच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. याचा दबाव आल्याच्या बाजारावर दिसून येत आहे. सध्या आल्याला २ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील आल्याची आवक आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे आल्याच्या भावातील मंदीही दिसेल, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हळदीचा भाव चढ उतार

देशातील बाजारात हळदीच्या भावात चढ उतार दिसून येत आहेत. नव्या हळदीची बाजारात आवक वाढत आहे. त्याचा परिणाम दरावर दिसून आला. यंदा देशात हळदीची लागवड वाढली आहे. पिकावर किड रोगांचा परिणाम झाला तरीही देशातील हळद उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा जास्तच राहील, अशी शक्यता आहे. त्यामुळे नवा माल बाजारात दाखल झाल्यानंतर दरात आतापर्यंत २  हजार ते ३ हजारांची नरमाई आली. आज हळदीला सरासरी ११ हजार ते १२ हजारांचा भाव मिळाला. बाजारातील हळदीची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे. पण यंदा हळदीच्या भावात मोठी नरमाई येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे हळदीच्या भावात काहीसे चढ उतार दिसतील, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

केळी दरात सुधारणा

केळी भावात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली. केळीला कुंभ मेळ्यानिमित्त उठाव मिळत आहे. यामुळे केळी दरात सतत वाढ झाली. यात आवक कमीच आहे. पिलबाग केळीमधूनही दर्जेदार केळीची आवक सध्या होत आहे. राज्यभरात केळीच्या भावात सुधारणा पाहायला मिळाली. मागील काही दिवसांपासून केळीचे भाव १८०० रुपयांपर्यंत पोचले. केळीच्या आवकेत पुढील महिनाभरानंतर वाढ होण्याचा अंदाज आहे. त्याचाही परिणाम दरावर दिसेल, असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीनमध्ये चढ उतार

अमेरिकेच्या आयात निर्यात धोरणाचा सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम होत आहे. आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात काहीशी वाढ झाली होती. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १०.५४ डाॅलर प्रतिबुशेल्सपर्यंत आले होते. तर सोयापेंडचे वायदे ३०५ डाॅलर प्रतिटनांपर्यंत कमी झाले होते. देशात सोयाबीनमधील मंदी कायम आहे. देशातील सोयाबीनची भावपातळी आजही ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होती. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ३३० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होते. देशातील बाजारात सोयाबीन भाव आणखी काही आठवडे दबावातच राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस स्थिरावला

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. देशातही कापसाचा बाजारभाव कमीच आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे कमी होऊन ६७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील बाजारात सध्या कापूस ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांनी विकला जात आहे. कापसाची बाजारातील आवक कमी होणार असली तरी सरासरीएवढी राहण्याचा अंदाज आहे. तर मार्चनंतर आवकेत घट होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

Sharad Pawar : सहकार चळवळीला सुरुंग

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT