Banana Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : केळी दरात पंधरवड्यात टनाला दोन हजारांची वाढ

Banana Rate : गेल्या १५ दिवसांत केळीच्या दरात टनामागे सुमारे दोन हजार रुपयांची वाढ झाली.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : मार्गशीर्ष महिन्याने केळीच्या दराला चांगलाच बूस्टर दिला आहे. पंधरवड्यापूर्वी १५००० हजार रुपये टनांपर्यंत असणारे केळीचे दर आता १७००० रुपये टनापर्यंत गेले आहेत.

गेल्या १५ दिवसांत केळीच्या दरात टनामागे सुमारे दोन हजार रुपयांची वाढ झाली. अनेक ठिकाणी मागणीच्या तुलनेत केळीचे उत्पादन नसल्याने ही दरवाढ आणखी महिनाभर कायम राहील, अशी शक्यता केळी उत्पादक शेतकरी तसेच व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील बहुतांश बाजारपेठांमध्ये केळीची चणचण आहे. अनेक ठिकाणी पाण्याबाबत समाधानकारक परिस्थिती नसल्याने शेतकऱ्यांनी केळी लागवडीला प्राधान्य दिले नाही. केळीच्या लागवडीत अचानक घट झाल्याने अनेक केळीच्या पॉकेटमध्येही केळी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.

केळी खरेदी-विक्री करणारे व्यापारी केळीसाठी शंभर ते दोनशे किलोमीटर प्रवास करत आहेत. अनेक गावांमध्ये तर केवळ एक ते दोन प्लॉट केळी असेच क्षेत्र असल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातील केळी खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांची झुंबड उडत आहे.

दिवाळीपर्यंत केळीच्या दरात उच्चांकी वाढ होती. दिवाळीनंतर मात्र टनास एक हजार रुपयापर्यंत घट झाली. मार्गशीर्ष महिन्यात मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत होती.

अपेक्षेप्रमाणे मागणीत वाढ झालीही. तुलसी विवाहानंतर विवाहाचे मुहूर्त असल्याने विवाहासाठीही केळीला मागणी वाढत असल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या उपलब्ध केळी प्लॉटलाही पाणी देताना शेतकऱ्यांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

अनेक विहिरी कूपनलिकांना पाणी कमी आल्याने केळीला अगदी गरजे इतकेच पाणी मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पुढील दोन महिन्यांमध्ये मात्र केळीला ठिबकने पाणी देण्याचेही आव्हान असल्याचे केळी उत्पादकांचे म्हणणे आहे.

पंधरा दिवसांच्या तुलनेत सध्या केळीला टनाला दोन हजार रुपयांनी दरवाढ झाली आहे. मागणी असल्याने शक्य होतील तेवढी केळी काढण्याचे नियोजन करत आहे.
- राजू मंगसुळे, औरवाड, ता. शिरोळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT