Team Agrowon
केळी पिकावर येणारा फ्युजारियम मर (विल्ट) हा मातीमधून पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. हा ‘पनामा मर’ या नावाने ओळखला जातो.
नवीन पाने हिरवी राहत असली तरी ती निस्तेज राहतात.
बऱ्याच वेळा अशी लक्षणे पिवळा सिगाटोका (करपा), इर्विनिया जिवाणू मर किंवा सीएमव्ही विषाणू रोगासारखी दिसतात.
उतिसंवर्धित रोपे निर्मितीतील कंपन्यांनी रोपे तयार करण्यासाठी कंदासाठी स्वत:च्याच मातृबागा लावाव्यात. परराज्यांतून किंबहुना राज्यातील इतर भागांतून देखील कंद आणू नये.
उतिसंवर्धित रोपे तयार करणाऱ्या कंपन्या महाराष्ट्राव्यतिरिक्त केळी लागवड करणाऱ्या इतर राज्यांत देखील रोपे पुरवठा करतात. वाहने, माणसे यांच्या वावरामुळे मातीच्या दूषित कणांद्वारे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो.
शासनाद्वारे देखील क्वारंटाइन नियमांची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. तरच भविष्यातील फ्युजारियम मर रोगाचा धोका टाळता येईल.