Banana Farming : तरुण शेतकऱ्यांच्या एकोप्यातून केळी निर्यात

Banana Cultivation : केळीची बिगर हंगामी लागवड करून निर्यात होऊ शकते का, यावर केळी उत्पादनाचे आगार असलेल्या इंदापूर, टेंभुर्णी, कंदर आदी भागांना भेटी देऊन अभ्यास केला.
Banana Farming
Banana FarmingAgrowon
Published on
Updated on

गणेश कोरे

गटाचे प्रमुख पांडुरंग निकम म्हणाले, ‘‘आम्ही शेतकरी पारंपरिक कांदा, बटाटा, टोमॅटो, ऊस आणि भाजीपाला पिके घेतो. मात्र बाजारभावामधील चढ-उताराचा फटका बसत असल्याने नवीन नगदी पिकाच्या शोधात होतो. दरम्यान, जैन इरिगेशनचे प्रतिनिधी तुषार जाधव यांनी केळी पिकाचा पर्याय सुचविला.

मात्र केळी निर्यात होण्यासाठी एक दोन एकरांवर नाहीतर किमान ५० एकर क्षेत्र एकाच ठिकाणी असावे. त्यामुळे निर्यातदारांना हमखास माल उपलब्ध होण्यास मदत होऊन निर्यात होऊ शकेल. या सल्ल्यानंतर आम्ही केळीचे आगार असलेल्या इंदापूर, टेंभुर्णी, कंदर परिसरांतील केळी उत्पादकांच्या आणि निर्यातदारांच्या भेटी घेतल्या आणि विविध टप्प्यांतील बांगांचा अभ्यास केला.’’

Banana Farming
Banana Disease : केळीमधील फ्युजारियम मर रोगाचे नियंत्रण

‘‘दरम्यान, आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांच्या क्षमतेनुसार अर्धा एकर ते चार एकर क्षेत्रावर लागवडी केल्या. या लागवडी साधारण डिसेंबर जानेवारी दरम्यान केल्या जेणेकरून, याचे उत्पादन नोव्‍हेंबर-डिसेंबर दरम्यान सुरू होईल. कारण या हंगामात इंदापूर परिसरात केळीचे उत्पादन कमी असते.

आमचा प्रयोग यशस्वी झाला आणि आम्ही ५० एकरांवर यशस्वी लागवड करू शकलो. आमच्या बागांना निर्यातदारांनी भेटी देऊन मार्गदर्शन देखील केले. त्यामुळे आम्ही खते, औषधांचे काटेकोर नियोजन करून निर्यातक्षम उत्पादन घेऊ शकलो,’’ असेही निकम यांनी सांगितले.

Banana Farming
Banana Rate : खानदेशात केळीदरात सुधारणा

...असे केले नियोजन

केळी तोडणी आणि पॅकिंग निर्यातदारच करत असल्याने मजुरीचा खर्च वाचला

बांधावरच सर्व शेतकऱ्यांसमोर प्रत्येक बागेचा दर ठरत असल्याने पारदर्शकपणा

दर ठरल्यानंतर तोडणी, पॅकिंग झाल्यावर लगेच बांधावरच पेमेंट होते.

....हे आहेत गटातील प्रमुख शेतकरी

ज्ञानेश्‍वर निकम, श्‍याम भोर, महेंद्र भोर, अनिल धुमाळ, संतोष वाघ, पांडुरंग निकम, गणेश निकम, किशोर निकम, सूर्यकांत वाघ, अजित धुमाळ.

दोन कोटींची उलाढाल

‘‘५० एकर निर्यातक्षम केळी लागवडीतून एकरी साधारण २५ टन उत्पादन मिळते. तर २० ते २५ रुपये सरासरी प्रति किलोला दर मिळतो. सर्व खर्च वजा जाता एकरी चार लाखांचे उत्पन्न मिळते. यातून दोन कोटी रुपयांच्या केळीची निर्यात या हंगामात झाली आहे,’’ असे शेतकऱ्यांनी सांगितले.

५० वरून १५० एकरांवर लागवड

पहिल्या वर्षी प्रयोग म्हणून ५० एकरांवरील लागवड आता १५० एकरांपर्यंत वाढली आहे. जागेवरच पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांना आत्मविश्‍वास आला. त्यामुळे आता आम्ही देखील आमचे क्षेत्र एक-दोन एकरानी वाढविले आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील रस दाखवत लागवडी केल्या आहेत.

- श्‍याम भोर, ७६२०००३४८६, केळी उत्पादक, रांजणी, ता. आंबेगाव. जि. पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com