Banana Market | Banana market price in Khandesh|
Banana Market | Banana market price in Khandesh|  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Arrival : खानदेशात केळी आवक आणखी घटली

Team Agrowon

जळगाव : खानदेशात केळीच्या आवकेत (Banana Arrival) आणखी घट झाली आहे. सध्या प्रतिदिन १४० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत असून दर (Banana Rate) किमान ८०० ते कमाल १४०० रुपयांपर्यंत मिळत आहे.

मागील काही दिवसात केळीच्या आवकेत २० ट्रकने घट झाली आहे. नोव्हेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी १८० ट्रक केळीची आवक होती. नंतर आवकेत सतत घट होत आहे. केळीला उठाव आहे. दर किमान ८००, ९००, १०००, १२०० व दर्जेदार केळीला कमाल १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. केळी काढणीवर अनेक भागांत उपलब्ध नाही.

केळीसाठी खरेदीदारांनी चार ते पाच गावांत जावे लागत आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल, मुक्ताईनगर भागांत पिलबाग किंवा खोडवा बागांत केळी आहेत. जळगावमधील चोपडा, जामनेर, भडगाव, पाचोरा या भागांत केळी फारशी काढणीवर नाहीत.

धुळ्यातील शिरपुरातही उशिराच्या कांदेबाग केळीमध्ये काढणी सुरू आहे. तसेच या भागातही पिलबाग केळीत केळी उपलब्ध होत आहेत. परंतु थंडीमुळे केळी हवी तशी पक्व होत नाहीत. पक्व होण्यास वेळ लागतो. यामुळे केळीची आवक घटली आहे.

केळीला उत्तर भारतासह राज्यातही उठाव आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नागपूर, राजस्थान, छत्तीसगड येथेही जळगावच्या केळीला मागणी आहे. मागणी असली तरी दर स्थिर आहेत.

रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागांत निर्यातक्षम केळीची काढणी अद्याप सुरू झालेली नाही. या भागातील नवती केळीची काढणी फेब्रुवारीअखेर सुरू होईल. दर्जेदार केळी या भागात काढणीसाठी उपलब्ध असेल. या केळीला परदेशात मागणी असते. यामुळे पुढेही स्थानिक बाजारात केळीची आवक कमी असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT