Chana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Market : अकोल्यात हरभऱ्याचा सरासरी दर ५३०० रुपये

Chana Rate : एकीकडे हरभरा डाळीची मागणी वाढली असल्याचे संकेत असतानाच दुसरीकडे बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचा दर मात्र फारसा बदललेला नाही.

Team Agrowon

Akola News : एकीकडे हरभरा डाळीची मागणी वाढली असल्याचे संकेत असतानाच दुसरीकडे बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचा दर मात्र फारसा बदललेला नाही. अकोला बाजार समितीत शुक्रवारी (ता. १) त्यास सरासरी ५३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर ४४७ पोत्यांची आवक झाली. या बाजारात हरभऱ्याचा किमान दर आजही ४००० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे. तर कमाल ६००५ रुपयांचा राहिला.

साधारण आठवडाभरापूर्वी म्हणजे २६ ऑगस्टला अकोल्यात हरभऱ्याचा दर ५२६० रुपये सरासरी होता. तेव्हा किमान दर ४९४५ व कमाल ५५९५ रुपये मिळाला होता. दोन दिवसांनी म्हणजेच २८ ऑगस्टला हाच सरासरी दर ५२०० रुपये मिळाला.

पुन्हा ३१ ऑगस्टला सरासरी दरात थोडी सुधारणा होऊन तो ५४०० झाला. शुक्रवारी (ता. १) १०० रुपयांनी सरासरी दर कमी होऊन ५३०० वर पोचला.

पश्‍चिम विदर्भात प्रमुख बाजारपेठांपैकी एक असलेल्या मलकापूर (जि. बुलडाणा) बाजार समितीत हरभरा सरासरी ५५७५ रुपयांनी विक्री झाला. कमाल ६१५४ रुपये दराने १२ क्विंटल हरभरा विकला.

या बाजारात २८ ऑगस्टला सरासरी दर ५१५१ रुपये होता. आता या दरात पाच दिवसांत थोडी सुधारणा होऊन ५५७५ पर्यंत पोचला. तरीही अपेक्षेप्रमाणे दरवाढ होत नसल्याचे सांगितले जात आहे.

अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने हरभरा साठविलेला आहे. दरवाढ झाल्यास हा हरभरा विक्रीस येऊ शकतो. पुढील महिन्यात रब्बी लागवडीला प्रारंभ होईल. पुढे पाऊस कसा राहतो, यावर रब्बी हरभरा लागवड अवलंबून आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: ज्वारीचा भाव टिकून; गवार तेजीत, जांभळाला उठाव, मुग दबावात, सोयाबीन दर मंदीत

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्यांना विलंब नको

Urea Shortage : युरियाच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकरी त्रस्त

Go Green Scheme : ‘गो-ग्रीन’मधून वीजबिलात १२० रुपयांची सवलत

Khandesh Water Crisis : टँकर घटले; काही भागांत टंचाई कायम

SCROLL FOR NEXT