Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) तर्फे पारंपरिक वसुबारस पूजन शुक्रवारी झाले. या कार्यक्रमातच म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांची वाढ, पशुखाद्य दरात ५० रुपयांची कपात आणि दूध संस्था व्यवस्थापन खर्चात १० पैशांची जादा वाढ जाहीर करण्यात आली. .याद्वारे ‘गोकुळ’ने दूध उत्पादक आणि दूध संस्थांची दिवाळी गोड केली आहे, अशी माहिती ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांनी दिली. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले की, ‘‘दूध उत्पादकांसाठी ‘गोकुळ’ने सर्वाधिक दर दिला आहे. मात्र, डिबेंचर कपातीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. .Gokul Dudh Dar: 'गोकुळ'कडून म्हैस, गायीच्या दूध खरेदी दरात १ रुपयाने वाढ, पशुखाद्य दरात ५० रुपयांची कपात.तसेच, ‘गोकुळ’ने आतापर्यंत म्हैस दूध दरात १४ रुपये प्रतिलिटर आणि गाय दूध खरेदी दरात ८ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे मोर्चा काढणाऱ्यांनी याचा अभ्यास करून बोलले पाहिजे.’’ ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे म्हणाले, ‘‘जिल्हा बँकेत रविवारी (ता. १२) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीवेळी दूध उत्पादकांना गाय आणि म्हैस दूध खरेदी दरात एक रुपयांची वाढ करण्याचा निर्णय झाला. .याशिवाय, पशुखाद्य दर कपात आणि दूध संस्था व्यवस्थापन खर्चात वाढ करण्याचाही निर्णय झाला. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यासह अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या सूचनेनुसारच दरवाढ केली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांची दिवाळी निश्चितपणे गोड झाली आहे.’’.बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार के. पी. पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, अजित नरके, बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील-चुयेकर, अभिजित तायशेटे, किसन चौगले, प्रकाश पाटील उपस्थित होते..Gokul Dudh Utpadak Morcha: 'गोकुळ'वर धडकला दूध उत्पादकांचा जनावरांसह मोर्चा, डिबेंचर कपातीवरुन मुश्रीफ विरुद्ध महाडिक संघर्ष वाढला.‘गोकुळ’ चीज ११५ रुपयेयाच कार्यक्रमात ‘गोकुळ चीज’ व ‘गोकुळ गुलाबजाम’ या नव्या उत्पादनांचे लोकार्पण करण्यात आले. ‘गोकुळ आइस्क्रीम’ लवकरच बाजारात आणले जाणार असल्याचीही घोषणा करण्यात आली. ‘गोकुळ’ गुलाबजाम प्रतिकिलो २१५ रुपये तर चीज प्रति अर्धाकिलोसाठी ११५ रुपये असा दर राहील..‘गोकुळ’चे निर्णयदूध दरवाढ : म्हैस दूध खरेदी दर ५१.५० रुपयांवरून ५२.५० रुपये तर गाय दूध खरेदी दर ३३ वरून ३४ रुपये प्रतिलिटरपशुखाद्य सवलत : ‘महालक्ष्मी गोल्ड’ व ‘कोहिनूर डायमंड’ पशुखाद्याच्या ५० किलो पोत्यामागे ५० रुपये सवलत जाहीर.९० पैशांऐवजी एक (१० पैशांची वाढ) रुपयापर्यंत दिला जाणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.