Chana Market : कळमना बाजार समितीत हरभरा दरात सुधारणा

Chana rate : हरभरा डाळीची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने गेल्या महिनाभरापासून दबावात असलेले हरभऱ्याच्या दरात आता तेजी अनुभवली जात असून, प्रतिक्विंटल किमान ५२८४ तर कमाल ६००० आणि सरासरी दर ५८२१ रुपये मिळत आहेत.
Chana Market
Chana MarketAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : केंद्र सरकारकडून हरभरा डाळ व हरभऱ्याच्या आहारातील वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर देशांतर्गत हरभरा डाळीची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने गेल्या महिनाभरापासून दबावात असलेले हरभऱ्याच्या दरात आता तेजी अनुभवली जात असून, प्रतिक्विंटल किमान ५२८४ तर कमाल ६००० आणि सरासरी दर ५८२१ रुपये मिळत आहेत.

Chana Market
Chana Market: नाफेड आता यंदा खरेदी केलेला हरभरा विकणार |Agrowon| ॲग्रोवन

नागपूरच्या कळमना बाजार समितीत हरभरा दर महिन्याच्या सुरुवातीला ४६५० ते ५१६१ रुपये प्रति क्विंटल असे होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हरभऱ्याच्या घरात सुधारणा अनुभवली जात आहे. ४८०० ते ५३६० असा दर १२ ऑगस्ट रोजी होता. त्यानंतर हरभरा दर तेजीतच राहिले आहेत. ५००० ते ५८७६ असा दर १८ ऑगस्ट रोजी मिळाला. २१ ऑगस्ट रोजी ५१०० ते ५९०० या दराने हरभऱ्याचे व्यवहार झाले. २४ ऑगस्ट नंतर हरभरा दर पुन्हा दबावात आले. ४८०० ते ५६१५ असा दर त्यानंतरच्या काळात होता.

दरम्यान केंद्र सरकारने आहारात हरभऱ्याचा उपयोग वाढवा याकरिता एक मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत प्रचार प्रसिद्धीवर भर देण्यात आला असून, केंद्र सरकारच्या या संकल्पनेमुळे हरभऱ्याचा आहारातील वापर वाढीस लागेल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे. त्यामुळेच नजीकच्या काळात हरभरा साठा केला जात असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हरभऱ्याच्या साठेबाजीमुळेच हरभरा दरात सुधारणा होत असल्याचे व्यापारी सूत्राने सांगितले. नजीकच्या काळात ही तेजी कायम राहील, अशी शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. सध्या कळमना बाजार समितीत हरभऱ्याची होणारी सरासरी आवक २०० क्विंटलच्या घरात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com