soybean rate
soybean rate  agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : हिंगोलीत सोयाबीनला सरासरी ५२१० रुपये दर

टीम ॲग्रोवन

हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात (Hingoli APMC) शनिवारी (ता. ३) सोयाबीनची १००५ क्विंटल आवक (Soybean Arrival) होती. सोयाबीनला (Soybean Rate) प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ५५२१ रुपये, तर सरासरी ५२१० रुपये दर मिळाले.

कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार (ता. २८) ते शनिवार (ता. २) या कालावधीत सोयाबीनची ६७५९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ५१३७ ते ५३९१ रुपये दर मिळाले.

सोमवारी (ता. २८) सोयाबीनची १६५५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५१०० ते कमाल ५६११ रुपये तर सरासरी ५३५५ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २९) सोयाबीनची १००० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५४७५ रुपये, तर सरासरी ५१३७ रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. ३०) सोयाबीनची ९०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ५६२६ रुपये, तर सरासरी ५३१३ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १) सोयाबीनची ११०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५१०० ते कमाल ५६८२ रुपये, तर सरासरी ५३९१ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. २) सोयाबीनची १०९९ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ५००५ ते कमाल ५६०१ रुपये, तर सरासरी ५३०३ रुपये दर मिळाले.

मागील दोन आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरात घसरण सुरू आहे. तेजीच्या अपेक्षेने अनेक शेतकरी सोयाबीन साठवून ठेवणे पसंत करत आहेत. त्यामुळे सोमवार (ता. २१) ते शनिवार (ता. २६) या आठवड्याच्या तुलनेत सोमवार (ता. २८) ते शनिवार (ता. ३) या आठवड्यात धान्य बाजारातील सोयाबीनच्या आवक २१४० क्विंटलने कमी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT