New Variety Of Tur, Soybean, Safflower : तूर, सोयाबीन, करडई च्या नविन वाणास मान्यता

Team Agrowon

सोयाबीनचे एमएयुएस-७२५ वाण महाराष्‍ट्र राज्‍याकरिता प्रसारित करण्‍यात आले आहे. हे वाण लवकर येणारे म्हणजेच ९० ते ९५ दिवसात तयार होते. 

New varieties of Tur, Soybean, Safflower approved | Agrowon

शेंगा जास्त प्रमाणात येतात. २०-२५ टक्के चार दाण्यांच्या शेंगा असलेले हे वाण आहे. 

New varieties of Tur, Soybean, Safflower approved | Agrowon

 बियाणाचा आकार मध्यम असून १०० दाण्यांचे वजन १० ते १३ ग्रॅम आहे. हे वाण कीड व रोगास मध्यम प्रतिकारक आणि  हेक्‍टरी उत्‍पादन क्षमता सरासरी २५ ते ३१.५० क्विंटल आहे.

New varieties of Tur, Soybean, Safflower approved | Agrowon

करडई पिकांचे पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) वाण  कोरडवाहू आणि बागायती लागवडीसाठी उपयुक्‍त आहे.

New varieties of Tur, Soybean, Safflower approved | Agrowon

करडईच्या या वाणात तेलाचे प्रमाण अधिक म्हणजेच ३०.९० टक्के आहे. मर आणि अल्‍टरनेरिया रोग आणि मावा किडीस सहनशील आहे.

New varieties of Tur, Soybean, Safflower approved | Agrowon

तुरीचे बीडीएन-२०१३-२ (रेणुका) हे वाण १६५ ते १७० दिवसात तयार होतो. हे वाण मर रोगास प्रतिकारक असून वांझ रोगास प्रतिबंधक आहे. या वाणाचे १०० दाण्याचे वजन ११.७० ग्रॅम आहे

New varieties of Tur, Soybean, Safflower approved | Agrowon
cta image | Agrowon
येथे क्लिक करा