Egg Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Egg Rate : मागणी वाढल्याने अंड्याचे दर पोहोचले ५५० वर

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : थंडीच्या दिवसात अंड्यांना मागणी वाढत असल्याने दरातही वाढ होते, असा अनुभव आहे. यंदा मात्र उन्हाळ्याच्या एप्रिल-मे महिन्यांतही अंडी दरात तेजी अनुभवण्यात आली. या काळात सरासरी दर ५०० रुपये शेकड्यावर होते. आता पावसाळ्यात तर अंडी दरात विक्रमी वाढ नोंदविण्यात आली असून हे राज्यात दर ५५० रुपयांवर पोहोचले आहेत.

नॅशनल एग्ज को-ऑर्डीनेशन कमिटीच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील रोजची अंडी मागणी एक कोटीच्या घरात आहे. राज्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या माध्यमातून ही गरज भागविणे शक्‍य होत नसल्याने आंध्र प्रदेश व देशाच्या इतर राज्यांतून अंडी आवक होते. त्या राज्यांमध्ये शेतीपूरक पोल्ट्री व्यवसायासाठी अनेक प्रकारच्या सवलत विषयक योजना राबविल्या जातात.

त्यामध्ये वीज दरात सवलत, शेतातील पोल्ट्री शेड ग्रामपंचायत करमुक्‍त तसेच अनुदानावर पोल्ट्री फिडचा पुरवठा अशा घटकांचा समावेश आहे. त्यामुळेच प्रतिनग अंडी उत्पादनावर कमी खर्च होत असल्याने या राज्यातून अंड्यांचा पुरवठा कमी दरात होतो. महाराष्ट्रातील दराच्या तुलनेत २० ते ३० रुपये प्रतिशेकडा दर कमी राहतात. सद्यःस्थितीत मात्र अंड्यांची उत्पादकता अपेक्षित नसल्याने महाराष्ट्रात दर ५०० रुपयांच्या पुढे गेले आहेत.

गेल्या काही दिवसांत हे दर ५३० रुपयांवर स्थिरावले होते. त्यानंतर रविवारी (ता. ७) दरात मोठी वाढ होत हे दर ५५० रुपयांच्या पुढे गेले. अंजनगावबारी (जि. अमरावती) येथील पोल्ट्री व्यावसायिक रवींद्र मेटकर यांच्या माहितीनुसार, अमरावती भागात रोजचे अंडी उत्पादन आठ लाख इतके आहे.

यासह महाराष्ट्रातील अंड्यांचा पुरवठा लगतच्या मध्य प्रदेश, तमिळनाडू तसेच पश्‍चिम बंगाल या राज्यातही होतो. पावसाळ्याच्या परिणामी आता दरात तेजी आलेली असली तरी पुढील काळात श्रावणी सोमवार सुरू होताच दर घसरतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. अंडी उत्पादनाचा प्रतिनग खर्च साडेचार रुपये आहे.

महाराष्ट्राची रोजची अंडी मागणी एक कोटी नग आहे. याची पूर्तता पोल्ट्री व्यावसायिकांकडून होत नसल्याने इतर राज्यातील आवक महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातूनही इतर राज्यांत अंडी पुरवठा होतो. सद्यःस्थितीत अंडी बाजार तेजीत आहे. ५०० रुपयांच्या पुढे सरासरी दर मिळत असल्याने व्यावसायिक समाधानी आहेत. रविवारी कोलकाता (पश्‍चिम बंगाल) बाजारात दराने मोठी ऊसळी घेत हे दर ५९५ रुपये शेकड्यावर पोहोचले. गेल्या अनेक वर्षांतील हा सर्वांत उच्चांकी दर आहे. महाराष्ट्रात याचवेळी ५५० रुपयांचा दर मिळाला.
- रवींद्र मेटकर, पोल्ट्री व्यावसायिक, अंजनगावबारी, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Story : खपली

Processing Industry : प्रक्रिया उद्योगाला मिळाली महिलांची साथ

Weekly Weather : राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Retreating Monsoon : परतीचा पाऊस थांबायचे नावच घेईना

Khandesh Rain : पावसामुळे खानदेशातील प्रमुख नद्या झाल्या प्रवाही

SCROLL FOR NEXT