Egg Rate : अंडी दर प्रतिशेकडा ५३० रुपयांच्या पार

Poultry Industry : अंडी दरात सातत्याने चढ-उतार अनुभवले जात आहेत. मागणी आणि पुरवठा यातील तफावतीच्या परिणामी हे घडत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
Egg
EggAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : अंडी दरात सातत्याने चढ-उतार अनुभवले जात आहेत. मागणी आणि पुरवठा यातील तफावतीच्या परिणामी हे घडत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्राची रोजची अंडी मागणी एक कोटीच्या घरात आहे. राज्यातील पोल्ट्रीधारकांच्या माध्यमातून त्याची पूर्तता होत नाही. परिणामी देशाच्या इतर भागांतूनही महाराष्ट्रात अंडी आवक होते. सद्यःस्थितीत अंड्याचे दर ५३० रुपये प्रतिशेकड्यावर पोहचले आहेत.

महाराष्ट्र ही अंड्याची मोठी बाजारपेठ मानली जाते. अजमेर (राजस्थान), हैदराबाद (तेलंगणा), होसपेठ (कर्नाटक) या भागातून राज्यात अंडी आवक होते. या माध्यमातून राज्याची गरज भागविली जात आहे. मे महिन्यात अंडी दरात सुधारणा अनुभवण्यात आली. त्यानंतर दर ४९० रुपयांपर्यंत खाली आले होते.

Egg
Egg Rate : जास्त तापमानामुळे अंड्याचे भाव तेजीत

उत्पादकता खर्च साडेचार रुपये असताना या दराने विक्री करणे अडचणीचे होते. त्यानंतरच्या काळात पुन्हा दर ५०० रुपयांच्या पुढे गेले. ५१०, ५२०, ५३० आणि ५४० रुपये प्रतिशेकडा या दराने देखील अंड्याचे व्यवहार झाले. सद्यःस्थितीत ५३० रुपयांवर दर स्थिरावल्याची माहिती व्यापारी सूत्रांकडून देण्यात आली.

Egg
Egg Rate : अंडीदरात राज्यात दहा रुपयांची घट

मागणी वाढती असल्यास यापुढील काळात अंडी दर आणखी वाढतील, अशीही शक्‍यता वर्तविली जात आहे. अंड्यांना हिवाळ्याच्या दिवसात मागणी अधिक राहते. मात्र पावसाळ्यात श्रावण मासाला सुरुवात झाल्यानंतर मागणी काहीशी कमी होते. त्याचा दरावर परिणाम होतो, असा गेल्या काही वर्षांतील हा व्यवसाय करणाऱ्यांचा अनुभव आहे.

अमरावती जिल्ह्यात रोजचे अंडी उत्पादन ८ लाखांवर आहे. मध्यप्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांत याचा पुरवठा होतो. खानदेशातील व्यापाऱ्यांकडून देखील या भागात खरेदी होते. नजीकच्या काळात अमरावतीतील अंड्यांना छत्रपती संभाजीनगर भागातून देखील मागणी होत आहे. दर कमी असलेल्या भागातून अंडी विकत घेण्यावर व्यापाऱ्यांचा भर राहतो.
- रवींद्र मेटकर, शेतकरी, अमरावती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com