Mango market
Mango market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Raw Mango : लोणच्याच्या कैऱ्यांची आर्णी बाजारात आवक

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : हवामानातील बदलाच्या परिणामी बाजारात लोणच्याच्या कैऱ्यांची आवक उशिरा सुरू झाली. आर्णी बाजारात देखील सद्यःस्थितीत लोणच्याकामी लागणाऱ्या कैऱ्यांची आवक वाढत आहे. त्यांना ५५ ते ६० रुपये किलोचा दर मिळत आहे.

शहरी भागात नाही, परंतु ग्रामीण भागात आजही कच्च्या कैरीची खरेदी करून त्यापासून लोणचे तयार करण्यावर भर दिला जातो. विकतच्या लोणच्यापेक्षा याची चव वेगळीच राहते. परिणामी घरच्याच लोणच्याला खवय्यांची देखील पसंती राहते, अशी स्थिती आहे.

सध्या आर्णी बाजारात लोणच्याकामी असलेल्या अस्सल गावरान कैऱ्यांची आवक होत आहे. ग्राहकांकडून देखील त्याला मागणी असून याला सरासरी ५५ ते ६० रुपये किलोचा दर मिळत आहे.

मोहरी, हळद, तेल, लसूण, मिरे, लवंग, मेथी, तीळ, हिंग या साऱ्या घटकांचा वापर लोणच्याकामी गृहिणींव्दारे केला जातो.

नंतर हे लोणचे चीनी माती किंवा काचेच्या बरणीत साठवले जाते. ग्रामीण भागात शिदोरीसह लोणचे दिले जाते. घरातील लहान मुलांसह सर्वांना या गावरान लोणच्याचे आकर्षण राहते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dhanesh Bird Conservation : धनेश संवर्धनासाठी देवरूखमध्ये फुलतेय रोपवाटिका

Soybean Crop Kolhapur : अस्मानी अन् सुलतानीच्या भीतीनं शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाकडे फिरवली पाठ!

Controlled Tourism : संवेदनशील क्षेत्रात हवे नियंत्रित पर्यटन

Agriculture Policy : पंतप्रधानांचा शेती क्षेत्राबद्दलचा दावा अन् वास्तव

Agriculture Award : कृषी पुरस्कार निवडीची राज्यभर प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT