Soybean
Soybean  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : अकोल्यात सोयाबीनची आवक वाढतीच

Team Agrowon

Akola News : पाऊस नसल्याने पेरण्या रखडलेल्या आहेत. तरीही हंगामासाठी बी-बियाणे, खतांची तजवीज करण्यासाठी शेतकरी आता बाजारपेठेत शेतीमालाची विक्री करीत आहेत. दरवाढीच्या अपेक्षेने आजवर साठवून ठेवलेले सोयाबीन प्रामुख्यान विक्रीसाठी आणले जात आहेत. सध्या आवक अडीच हजार क्विंटलपेक्षा अधिक होत आहे.

या हंगामात सोयाबीनचा दर सातत्याने दबावात राहिल्याने शेतकऱ्यांनी हंगामापर्यंत सोयाबीन साठवून ठेवण्यावर भर दिला. आजही अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे. मात्र, सोयाबीनला अपेक्षित दरवाढ होण्याची आता कुठलीही चिन्हे दिसत नसल्याने तसेच हंगामासाठी पैशांची गरज असल्याने अनेक शेतकरी बाजारात सोयाबीन विक्रीला आणू लागले आहेत.

यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनची आवक अडीच हजार क्विंटलपेक्षा अधिक होत आहे. गुरुवारी (ता. २२) २८७८ क्विंटल सोयाबीन विक्रीला आले होते. पावसाला सुरुवात झालेली नसल्‍याने शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचे वातावरण तयार होऊ लागले आहे.

त्यातच आजपर्यंत साठवून ठेवलेल्या सोयाबीनचाही दर अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही. शेतकऱ्यांनी आतापर्यंत दरवाढीची प्रतीक्षा केली आहे.

तीळदर तेरा हजार रुपयांपर्यंत

यंदा उन्हाळी हंगामात या भागात तिळाची लागवड झाली होती. सध्या हा तीळ बाजारात विक्रीला येत आहे. बाजारात तिळाला सर्वाधिक १३००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. किमान दर १२०२५ मिळतो आहे. आवक दररोज आठ ते दहा क्विंटल एवढी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Market : तेजीनंतर आता तुरीचा बाजार दबावात

Raw Mango : लोणच्याच्या कैऱ्यांची आर्णी बाजारात आवक

Onion Market : नगर जिल्ह्यात कांदादर ३१०० ते ३२०० रुपयांवर स्थिर

HTBT Cotton : सविनय कायदेभंग करीत ‘एचटीबीटी’ची लागवड

Ginger Market : आले पिकाच्या दरात सात ते आठ हजारांनी घट

SCROLL FOR NEXT