Team Agrowon
सोयाबीन हे भारतातील तसेच जगाचे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. सोयाबीन हे जगभरातील खाद्यतेल आणि पौष्टिक अन्नाचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे.
खाद्यतेलाच्या आयातीच्या खर्चामुळे आपल्या परकीय चलनावर मोठा परिणाम झाला आहे. सर्व तेलबिया पिकांपैकी सोयाबीन हे महत्वाचेे पीक आहे.
देशाच्या एकूण खाद्यतेलाच्या उत्पादनात सोयाबीनचा 22 टक्के वाटा आहे. भारतात 60 च्या दशकापासून त्याची व्यावसायिक लागवड सुरू झाली.
सोयाबीनच्या उत्पादनात मध्य प्रदेशचा अनेक वर्षांपासून प्रथम क्रमांक होता. पण आता महाराष्ट्र सोयाबीन उत्पादनात नंबर वन झाला आहे.
देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा आता ४५.३५ टक्क्यांवर गेला आहे, तर मध्य प्रदेशचा वाटा आता केवळ ३९.८३ टक्के आहे
आता एकूण उत्पादन वाटा आणि उत्पादकता या दोन्ही बाबतीत महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या अहवालात ही बाब समोर आली आहे.
कापसाच्या तुलनेत सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आता सोयाबीन या पिकाकडे वळाले आहेत.
मध्य प्रदेशात हेक्टरी उत्पादन 11 ते 11.5 क्विंटल प्रति हेक्टर आहे. तर महाराष्ट्रात ते 14 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर आहे.