Kesar Mango Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Kesar Mango : मराठवाड्याच्या ‘केसर’ची अपेक्षेप्रमाणे आवक नाहीच

Mango Season : मराठवाड्यासह गुजरात व आंध्रातील आंब्यांच्या आवक व दरात गत आठवडाभरात चढ-उतार पाहायला मिळाला.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यासह गुजरात व आंध्रातील आंब्यांच्या आवक व दरात गत आठवडाभरात चढ-उतार पाहायला मिळाला. अपेक्षेप्रमाणे अजूनही मराठवाड्याच्या केसरची आवक होत नसून अक्षय तृतीयेनंतर आता मराठवाड्यासह गुजरातमधून केसर तसेच आंध्रातून इतर आंबे मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होण्याची आशा आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील बाजार समितीमध्ये ४ मे रोजी ११४ क्विंटल आवक झालेल्या बदाम, लालबाग, केसर, हापूस, दशहरी आदी आंब्याचे दर ३००० ते १७ हजार रुपये दरम्यान व सरासरी १० हजार रुपये प्रतिक्विंटल राहिले.

यामध्ये इतर आंब्यांच्या तुलनेत सर्वाधिक आवक छत्रपती संभाजीनगरसह इतर जिल्ह्यातून आलेल्या केसरची राहिली. ८ मे रोजी १७४ क्विंटल आवक झालेल्या आंब्यांना ३५०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान तर सरासरी ५२५० रुपये दर मिळाला. ९ मे रोजी ७६३ क्विंटल आवक झालेल्या आंब्यांना ४००० ते १२ हजार रुपये तर सरासरी ८००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

अक्षय तृतीयेपूर्वी केसरचे दर राहिले बरे

छत्रपती संभाजी नगर येथील बाजारात अक्षय तृतीयेपूर्वी आवक झालेल्या केसर आंब्याचे दर १०० ते १६० रुपये प्रतिकिलो होते. त्यानंतर मात्र गुजरात केसर व आंध्रातील आंबे बाजारात दाखल होण्याची शक्यता असल्याने केसरचे दर थोडे दबावात येण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली.

पावसामुळे करावी लागली घाई

काही दिवसांपासून मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत वादळी पाऊस धुमाकूळ घालतो आहे. या तडाख्यात आपली बाग सापडू नये म्हणून अनेकांनी आंबा उतरविण्याची घाई केली. यात घाईत अपरिपक्व आंबा उतरविला जात आहे.

त्यामुळे अपेक्षेनुरूप आकार असलेली फळे बाजारात कमी येत आहेत. यापुढील काळात मात्र चांगल्या दर्जाची फळ बाजारात येतील, अशी आशा आहे. सध्या चांगल्या आकाराची फळे बाजारात चांगला दर घेत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: काटा मारणारेच भाजपमध्ये; कारवाईचे धाडस दाखवा: राजू शेट्टी

Sugar Factory Project: महाराष्ट्र निवडक पंधरा कारखान्यांत सीबीजी प्रकल्प

Sugar Price: सणासुदीच्या तोंडावर साखरेचे दर तेजीत

Government Relief Delay: सरकार प्रस्तावातच मग्न

Maharashtra Weather: राज्यात विजांसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT