Kesar Mango : केसर आंब्याचे दर बारा हजार रुपयांवर

Mango Season : स्थानिक फळे, भाजीपाला बाजार समितीमध्ये आंब्याची आवक मर्यादित असतानाच केसर आंब्याच्या दरात चांगलीच तेजी अनुभवली जात आहे.
Mango Season
Mango SeasonAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : स्थानिक फळे, भाजीपाला बाजार समितीमध्ये आंब्याची आवक मर्यादित असतानाच केसर आंब्याच्या दरात चांगलीच तेजी अनुभवली जात आहे. सध्या केसर आंब्याची आवक १४० क्विंटल आहे. याला १० ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. ग्राहकांची मागणी चांगली असल्याने या पुढील काळात दरात आणखी सुधारणा होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यात केसर आंब्याखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत महाराष्ट्राच्या विविध भागातून केसर आंबा आवक होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून केसर आंब्याची आवक १४० क्विंटलवर स्थिरावली आहे.

Mango Season
Mango Market : वाशी बाजारात दोन दिवस १ लाख आंबा पेट्या आवक

सध्या तापमानात वाढ होत असल्याने आंब्याला मोठी मागणी आहे. त्यामुळेच केसर आंब्याचे व्यवहार १० ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे होत आहेत. आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा भागातून बैंगनपल्ली आंब्याची २१० क्विंटल आवक होत आहे. ही आवक नियमित असल्याची माहिती देखील देण्यात आली.

Mango Season
Mango Alphonso : कोकणी की कर्नाटकी, हापूस आंबा आता 'क्यूआर' कोडवर समजणार

बैंगनपल्ली आंब्याला चार हजार ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. याच्या जोडीला इतर स्थानिक वाणाच्या आंब्याची देखील आवक होत असून, ३५०० ते ५५०० असा दर याला मिळत आहे.

याची आवक देखील २०० क्विंटल पेक्षा अधिक आहे. आंब्याच्या जोडीला बाजारात उन्हाळी फळ असलेल्या टरबुजाची देखील आवक होत आहे. ४७० क्विंटल वर टरबूज आवक पोहोचली असून ८०० ते १२०० रुपयांचा दर याला मिळत आहे.

कैरीची आवक ११० क्विंटल

ग्राहकांची कैरीला देखील मोठी मागणी आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून अमरावती बाजार समितीत ११० क्विंटल कैरीची नियमित आवक होत आहे. सध्या कैरीला ३००० ते ३५०० असा दर मिळत आहे. मध्यंतरी गारपीट अवकाळी पावसामुळे कैरीला मागणी घटली होती. त्यामुळे दरातही घसरण अनुभवण्यात आली. आता पुन्हा तापमानात वाढ झाल्याने कैरीला देखील मागणी वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com