Kolhapur News: चिकोत्रा प्रकल्पाच्या नदीपात्रातून शेतीसाठी होणारा पाणी उपसा नियंत्रित करण्यासाठी पाटबंधारे विभागाने उपसाबंदी लागू केली आहे. पाटबंधारे विभागाचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे यांनी महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ नुसार हा आदेश जारी केला आहे..या आदेशानुसार चिकोत्रा नदी परिसरातील को.प. बंधारा क्र. १ ते को.प. बंधारा बेळुंखी (२९) या दरम्यान ठरावीक कालावधीत पाणी उपसा करण्यास बंदी राहणार आहे. ही उपसाबंदी २१ ते २९ मार्च, १८ ते २६ एप्रिल आणि १६ ते २४ मे या कालावधीत लागू राहील..Well Water Tax: विहिरींवरील अन्यायकारक पाणीपट्टी आकारणी थांबवा.या कालावधीत शेतीसाठी नदीपात्रातून पाणी उपसा करणारी कोणतीही यंत्रणा चालू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. उपसाबंदीच्या काळात अनधिकृतपणे पाणी उपसा करताना आढळल्यास संबंधित उपसा यंत्र जप्त करण्यात येईल. .Water Theft: घोडच्या उजव्या कालव्याचा भराव फोडून पाणीचोरी.तसेच परवानाधारकाचा उपसा परवाना एक वर्षासाठी रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. .दरम्यान, उपसाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नसल्याचेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.