Maize Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Khandesh Maize Market : खानदेशात मका आवक सुरू

Khandesh Maize Rate : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मका आवकेस सुरुवात झाली आहे. सध्या आवक कमी किंवा रखडत सुरू असून, दर प्रतिक्विंटल १४५० ते २००० व सरासरी १७५० रुपये, असे आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मका आवकेस सुरुवात झाली आहे. सध्या आवक कमी किंवा रखडत सुरू असून, दर प्रतिक्विंटल १४५० ते २००० व सरासरी १७५० रुपये, असे आहेत. मका आवक पुढील आठवड्यात वाढेल, असा अंदाज आहे.

खानदेशात खरिपात तृणधान्यामध्ये मक्याची अधिक लागवड झाली होती. कडधान्यापेक्षा ही लागवड कमी होती. परंतु ज्वारीऐवजी अनेकांनी मक्यास पसंती दिली होती. सर्वाधिक लागवड जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, जामनेर, पाचोरा, धरणगाव या भागात झाली होती. खानदेशातील एकूण लागवड सुमारे ४५ हजार हेक्टरवर झाली होती.

अतिपावसात ज्वारीच्या नुकसानीची भीती असते. मक्याचे तुलनेत कमी नुकसान होते. मागील वर्षी परतीच्या पावसात मका वगळता इतर पिकांची अधिक हानी झाली होती. ही बाब लक्षात घेऊन अनेकांनी मका लागवड केली.

यंदा पिकात अमेरिकन लष्करी अळीने पीक २६ ते २८ दिवसांचे झाल्यानंतर नुकसान केले. शेतकऱ्यांना कीडनाशके, अळीनाशके, संप्रेरके, खतांचा उपयोग करून ही समस्या आटोक्यात आणावी लागली.

मागील आठवड्यात मक्याची मळणी सुरू झाली आहे. मागील काही दिवस खानदेशात पाऊस आलेला नाही. वातावरणही बऱ्यापैकी कोरडे किंवा निरभ्र आहे. यामुळे मका पीक पक्व होऊन मळणीवर आले. कोरड्या वातावरणाने कापणी, मळणीचे कामही विना अडथळा सुरू आहे. मागील आठवड्यातच मक्याची बाजारात आवक सुरू झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबार येथील बाजारात मक्याची आवक सुरू आहे. चोपडा येथील बाजार समितीत मागील चार ते पाच दिवस प्रतिदिन सरासरी १६० क्विंटल मक्याची आवक झाली आहे. जळगाव येथील बाजार समितीतही प्रतिदिन सरासरी १८० क्विंटल मागील तीन दिवस राहीली आहे.

पुढे ही आवक प्रतिदिन सरासरी एक हजार क्विंटलवर जळगावात पोहोचेल, असाही अंदाज आहे. कमी दर्जाच्या मक्यास चोपडा येथील बाजार समितीत १४४२ व कमाल २०४२ व सरासरी १७५२ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जळगाव येथील बाजारतही किमान १४५० व कमाल २०५० रुपये दर आहे.

कुठेही दर २१०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक नसल्याची माहिती मिळाली. हे सुरुवातीचे दर आहेत. पुढे आणखी किती दर मिळतील, याबाबत खरेदीदारांनी अंदाज व्यक्त केलेला नाही. परंतु आवकेवर दरांचे गणित आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पूरस्थितीचा आढावा; अतिरिक्त १ हजार ६०० कोटींची मदत जाहीर

Agriculture Technology: धान्य साठवणुकीतून नफ्याचे गवसले तंत्र

Cotton Import Duty: कापूस उत्पादकांच्या अस्तित्वावर घाला

Dragon Fruit Benefits: क्षेत्र वाढते, जाणीव-जागृती वाढवा

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

SCROLL FOR NEXT