Maize Sowing : शेतकऱ्यांची मक्याला पसंती

Kharif Season : खरीप हंगामात चारा पीक म्हणून मका पिकांकडे कल वाढल्याने मका पिकांच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे.
Maize
MaizeAgrowon
Published on
Updated on

Pune News : खरीप हंगामात चारा पीक म्हणून मका पिकांकडे कल वाढल्याने मका पिकांच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत एक लाख १४ हजार ९८० हेक्टरपैकी एक लाख ६२ हजार ५०१ हेक्टरवर मका पीक घेतले आहेत. येत्या काळात जनावरासाठी मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होणार असून चाराटंचाई फारशी भासणार नसल्याचे चित्र आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांशी शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. त्यामुळे अनेक शेतकरी गाई, म्हशी, बैल अशा जनावरांचे संगोपन करतात. जनावरांसाठी चारा वेळेत उपलब्ध व्हावा म्हणून अनेक शेतकरी हिरवा चाऱ्यासाठी मका, कडवळ, बाजरीची पेरणी, तर नेपिअर ग्रास, लुसर्नग्रास अशा विविध चारा पिकांची लागवड करतात. त्यामुळे जनावरांना वर्षभर पुरेल एवढा चारा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतो.

Maize
Maize Army Worm : नाशिकमध्ये मक्यावर अमेरिकन लष्करी अळी

मागील काही वर्षभरात दुग्ध उत्पादनात मोठी उलाढाल झालेली आहे. त्यामध्ये दुधाला बऱ्यापैकी मिळत असलेला बाजारभाव आणि विविध तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विविध डेअरी उद्योगाच्या माध्यमातून दुग्धपूरक उद्योग वाढीस लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुग्धउत्पादन व्यवसायात मोठी संधी चालून आली आहे.

त्याचा आर्थिक फायदा होत आहे. मका पिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे दूध उत्पादनात वाढ होऊन दुधाची फॅट ही गुणवत्ता चांगली येते. त्यासोबतच मक्याच्या चाऱ्याचा वापर करून मुरघास मोठ्या प्रमाणात केला जातो. उन्हाळ्यात सुद्धा ओल्या चाऱ्याची उपलब्धता मुरघासामुळे होते. त्यामुळे जनावरांच्या दुग्ध उत्पादनात कोणताही बदल होत नसल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक नफा मिळतो.

Maize
Maize Market : मका उत्पादकांना ‘ऊर्जा’ मिळेल?

पुणे विभागासह राज्यात गायी, म्हशी, शेळ्या, कालवडी, बैल यांची जवळपास तीन ते साडेतीन कोटी जनावरांची संख्या आहे. यंदा कमी पावसामुळे चाराटंचाई भासू नये म्हणून शेतकरी पुढाकार घेत चारा पिकांचे नियोजन करत आहेत.

त्यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना मका पिकासारख्या चारा पिकांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. त्याचा फायदा बहुतांशी शेतकरी घेत चारा पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चारा पिकांचे उत्पादन होते.

मोठ्या दाण्याच्या मक्याची लागवड

पुणे परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या आकाराच्या दाण्याच्या मक्याची लागवड करतात. त्यासाठी किमान तीन ते चार महिने लागतात. मक्याची कणसे काढणीच्या अवस्थेत आल्यानंतर फक्त कणसे काढून कंपनीला अथवा मार्केटमध्ये विकतात. त्यातून चांगले उत्पादन मिळत असल्याने अनेक शेतकरी याकडे वळत आहेत. त्यामुळे मका लागवडीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे.

पुणे विभागात पीकनिहाय झालेली पेरणी ः हेक्टरमध्ये

जिल्हा --- सरासरी क्षेत्र --- लागवड झालेले क्षेत्र--- टक्के

नगर -- ६०,७९९ -- ८४,८४२ -- १३९

पुणे -- १८,८२८ -- २१,२८६ -- ११३

सोलापूर --- ३५,३५३ -- ५६,३७३ -- १५९

एकूण -- १,१४,९८० --- १,६२,५०१ -- १४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com