Baramati News : बारामती बाजार समितीतील केद्रात शासकीय मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये विकेंद्रीत धान खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने भरडधान्य (मका) खरेदीसाठीची ऑनलाईन नोंदणी १ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून ३० नोंव्हेबरपर्यंत नावनोंदणीसाठी मुदत आहे, अशी माहिती बारामती बाजार समितीचे सभापती सुनील पवार यांनी दिली.
ऑनलाईन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचाच मका प्रतिक्विंटल २ हजार ९० रुपये दराने खरेदी करण्यात येणार आहे. सध्या मक्याचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात आवक सुरू झाली आहे. त्यामुळे बारामती बाजार समितीने शासनाकडे हमीभाव खरेदी केंद्राची मागणी केल्याने ते मंजूर झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर मुदतीत नावनोंदणी करून खरेदी केंद्राचा फायदा घ्यावा.
मका खरेदी केंद्रावर शेतक-यांनी नावनोंदणीसाठी मका पिकाची नोंद असलेला सात-बारा उतारा (पिकपेरा) आवश्यक आहे. याशिवाय आधारकार्डची छायांकित प्रत व चालु असलेले बॅक खाते अचूक तपशिलासह झेरॉक्स, मोबाइल नंबर इ. आवश्यक कागदपत्रे तसेच एकापेक्षा जास्त बँक खात्यांकरिता एकाच शेतकचऱ्याची नोंद असू नये.
तरी मका उत्पादक शेतकऱ्यांनी निरा कॅनॉल संघ, तीन हत्ती चौक बारामती येथे प्रथम ऑनलाइन नाव नोंदणी करावी. खरेदी सुरू झाल्यानंतर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार मका खरेदी केंद्रावर आणण्यासाठी नंबरनुसार एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. त्यानुसार शेतकऱ्यांनी बारामती बाजार समितीचे यांत्रिक चाळणी येथील खरेदी केंद्रावर मका स्वच्छ व वाळवून आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात येत आहे.
मक्याचा हमीभाव दर प्रतिक्विंटल २ हजार ९० रुपये आहे. ज्या शेतकऱ्यांची नावनोंदणी होईल त्या शेतकऱ्यांचा मका खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी बंधनकारक आहे, अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.