Jaggery Market
Jaggery Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jaggery Market : गुळाची आवक निम्म्याने घटली

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत गुळाची निर्मिती (Jaggery Production) निम्म्यावर आल्याने गुळाची आवक (Jaggery Arrival) मोठ्या प्रमाणात घटली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा केवळ निम्म्या प्रमाणातच गुऱ्हाळे सुरू आहेत. त्यामुळे गूळ बाजारात फारसा उत्साह जाणवत नसल्याची स्थिती आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे १०० गाड्या गूळ दररोज बाजार समितीत येत होता. हीच संख्या आता ५० ते ६० गाड्यांवर आली आहे.

बाजार समितीत दररोज १५ ते २० हजार गूळ रवे इतकीच आवक होत आहे. या कालावधीत सातत्याने ३० हजार रव्याच्या वर आवक बाजार समितीत होत असते. जिल्ह्यातील अनेक गूळ उत्पादक गावांत ५० टक्के ही गुऱ्हाळघरे सुरू झाली नाहीत.

गुळाचा दर व अन्य कारणांमुळे सहा महिने गुऱ्हाळे सुरू ठेवणे परवडत नसल्याने यंदा अनेक गुऱ्हाळ मालकांनी गुऱ्हाळे बंद ठेवली आहेत. गुळाची आवक जरी मंदावली असली तरी गुजरातमध्ये फारशी मागणी नसल्याने दर ही तेजीत नसल्याची स्थिती आहे. दिवाळीनंतर गुजरातच्या बाजार समित्यांत रोडावलेली मागणी अजूनही कमीच असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

नोव्हेंबर व डिसेंबर हा कालावधी गुऱ्हाळघरासाठी अत्यंत वेगवान असतो. या कालावधीत मोठ्या संख्येने गुऱ्हाळे सुरू असतात. अवकाळी पावसाची विश्रांती आणि थंडीच्या पार्श्वभूमीवर गुऱ्हाळ घरे वेगाने सुरू असतात. यामुळे या कालावधीत दरही बऱ्यापैकी असतात. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे.

गुऱ्हाळे सुरू असली तरी ज्या गतीने गूळ बाजार समितीत यायला हवा, त्या गतीने तो येत नसल्याची स्थिती आहे. आवक जवळजवळ निम्म्यावर आल्याने गूळ बाजारात लगबग कमी आहे. लग्नसराईचा कालावधी असला तरी लग्न समारंभांत गुळापेक्षा साखरेच्या पदार्थांना जास्त महत्त्व दिले जात आहे. यामुळे गुजरात व अन्य राज्यांमधूनही गुळाला आवक फारशी नसल्याचे व्यापारी सूत्रानी सांगितले.

बारमाही गुळाचा फटका

गेल्या वर्षी वर्षभर कोल्हापूर बाजार समितीचा गूळ बाजार सुरू राहिला. पाऊस असला तरी आठवड्यातून एक दोन दिवस तरी गुळाची आवक ही शेवटपर्यंत सुरू होती. या बरोबरच बाहेरील व्यापाऱ्यांना कर्नाटक व अन्य भागांतूनही बारमाही गूळ मिळत आहे.

त्यामुळे गुजरातमधील व्यापाऱ्यांनी साठा करून ठेवण्यासाठी कोल्हापुरी गुळाची खरेदी केली नाही. जेवढी मागणी तेवढ्याच गुळाची खरेदी झाल्याने खरेदीत व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली नाही. परिणामी दर मंदावलेलेच राहिले. अपवाद वगळता गूळ हंगाम सुरू झाल्यानंतरही अशीच परिस्थिती आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बाजार समितीत गुळाची आवक कमी आहे. गुऱ्हाळाची संख्या कमी झाल्याने गुळाचे उत्पादन कमी होत आहे.

- अनिल पाटील, गूळ विभाग, कोल्हापूर बाजार समिती.

सोमवारचे (ता.२६) कोल्हापूर बाजार समितीतले दर

दर्जा...सरासरी दर (प्रतिक्विंटल, रुपये)

स्पेशल...४१०० ते ४१७५

१...४००० ते ४१००

२...३८०० ते ३९९०

३...३४०० ते ३७९०

४...३१०० ते ३३९०

एक किलो बॉक्स...३१०० ते ४१००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT