Betel Leaf Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Betel Leaves Supply : आंध्र प्रदेश, कर्नाटकातून खाऊच्या पानांची आवक

Betel Leaf Update : थंडीमुळे उमरखेड तालुक्यातील खाऊची पाने सध्या आकाराने लहान असून, सद्यःस्थितीत त्यांना २५० ते ४०० रुपयांना प्रति हजार नग असा दर मिळत आहे. चांगल्या प्रतीच्या आणि आकाराच्या पानाला ६०० रुपयांपर्यंतचा दर मिळत असतो.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : थंडीमुळे उमरखेड तालुक्यातील खाऊची पाने सध्या आकाराने लहान असून, सद्यःस्थितीत त्यांना २५० ते ४०० रुपयांना प्रति हजार नग असा दर मिळत आहे. चांगल्या प्रतीच्या आणि आकाराच्या पानाला ६०० रुपयांपर्यंतचा दर मिळत असतो. सध्या बाजारात आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागांतून पानाची आवक होत असून, त्याला ४०० ते ४५० रुपये प्रति हजार असा दर मिळत आहे. त्या भागातील वातावरण पानाचा आकार वाढीसाठी सध्या पोषक आहे. त्यामुळेच आंध्र प्रदेश, कर्नाटकमधील पानांना बाजारात चांगला दर देखील आहे.

तापमानात वाढीच्या परिणामी जूननंतर खाऊचे पानाचे दरात सुधारणा होईल, अशी शक्‍यता विडूळ येथील गजानन बिच्चेवार यांनी व्यक्‍त केली आहे. उमरखेड तालुक्‍यातील विडूळ परिसरात लिंगायत समाजाचे वास्तव्य आहे. या समाज बांधवांकडून परंपरागत पद्धतीने खाऊच्या पानाचे उत्पादन वर्षानुवर्षांपासून केले जाते. विडूळ परिसरात सुरुवातीला खाऊच्या पानाखालील क्षेत्र मोठे होते.

त्यानंतरच्या काळात कीड, रोगाचा वाढता प्रादुर्भाव, बाजारात दराच्या बाबतीत होणारी ओढाताण यामुळे नजीकच्या काळात हे क्षेत्र कमी झाल्याचे गजानन बिच्चेवार यांनी सांगितले. खाऊच्या पानाला पोळा, महालक्ष्मी, गणपती या काळात मागणी वाढत दर तेजीत येतात, असा अनुभव आहे. सध्या थंडीमुळे पानाचा आकार वाढत नसल्याने दर दबावात राहतात, अशी माहिती त्यांनी दिली.

उमरखेड येथे बुधवार, शनिवार असे दोन दिवस खाऊच्या पानाचा बाजार भरतो. त्या पार्श्‍वभूमीवर पान तोडणीचे नियोजन केले जाते. याशिवाय मागणी असल्यास नागपूर तसेच तांबूल तयार करण्यासाठी माहूरच्या रेणुकादेवी गडावर देखील पानाचा पुरवठा होतो. या दोन्ही ठिकाणावरून मागणी नसेल त्या वेळी खानदेशातील भुसावळ येथे पानाचा पुरवठा केला जातो. त्याकरिता सामूहिक पद्धतीने वाहतुकीचा भार उचलण्यावर भर असल्याचेही गजानन बिच्चेवार यांनी सांगितले.

विडूळ परिसर खाऊच्या पानाचे हब म्हणून कधीकाळी ओळखला जात होता. एक दिवसाआड एक ट्रक खाऊच्या पानाची वाहतूक या भागातून होत होती. आता अवघे ३० पानमळे शिल्लक असून लागवड क्षेत्र सरासरी ६० एकर इतके आहे. मात्र त्यातूनही एका एकरातून दररोज ५० हजार पानाची उत्पादकता होते, असे गजानन बिच्चेवार यांनी सांगितले. एका एकरात दहा ते बारा लोकांना रोजगार मिळतो.

प्रति हजार पानावर १५० पान अतिरिक्‍त घेतली जातात. खराब प्रतीची पाने निघाल्यास त्यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी व्यापारी अशी खेळी खेळतात. शिल्लक पाने न दिल्यास खराब पाने पेटाऱ्यात आढळली तर दर कमी करून परतावा दिला जातो. त्यामुळे दोन्ही प्रकारात शेतकऱ्याचेच नुकसान होते.
गजानन बिच्चेवार, पान उत्पादक, विडूळ, उमरखेड, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT