Banana Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Export : आंध्र प्रदेशात निर्यातीच्या केळीची आवक वाढली

Banana Market : देशात निर्यातीच्या केळीची आवक आंध्र प्रदेशात वाढली आहे. तेथून आखातसह इतर भागांत रोज ३५ ते ३६ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची पाठवणूक सुरू आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : देशात निर्यातीच्या केळीची आवक आंध्र प्रदेशात वाढली आहे. तेथून आखातसह इतर भागांत रोज ३५ ते ३६ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची पाठवणूक सुरू आहे. तमिळनाडू भागातूनही रोज पाच ते सहा कंटेनर निर्यात होत आहे. दाक्षिणात्य भागात निर्यातीच्या केळीचे दर सध्या प्रतिक्विंटल २३०० रुपये असे आहेत.

राज्यात सोलापूर व लगतच्या भागातून रोज १४ ते १५ कंटेनर केळीची निर्यात परदेशात होत आहे. देशात निर्यातीच्या केळीस सोलापुरात सर्वाधिक २४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. खानदेशात अद्याप निर्यातीच्या केळीची आवक कमी किंवा अत्यल्प आहे.

थंडीत खानदेशात केळी बागा व्यवस्थित येत नसल्याने थंडीत काढणीवर येणाऱ्या बागांची लागवड टाळली जाते. यामुळे सध्या खानदेशात केळीची आवक अत्यल्प स्थितीत किंवा कमीच आहे.

सध्या खानदेशात रोज ३५ ते ४५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. पिलबाग किंवा खोडवा बागांमध्ये मुक्ताईनगर, रावेर, यावल, धुळ्यातील शिरपूर भागात आवक सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जामनेर, जळगाव भागातील कांदेबाग केळीची काढणी १०० टक्के पूर्ण झाली असून, सध्या उशिराच्या बागांमधून आवक सुरू आहे.

पिलबाग केळीचे दर खानदेशात १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. दर्जेदार केळीला किंवा नॉन चिलिंग बागांमधील केळीचे दर खानदेशात २००० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. कमी दर्जाच्या केळीचे दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. केळीची आवक सध्या थंडीमुळे रखडत सुरू आहे. खानदेशातून सध्या आखातात केळीची पाठवणूक होत नसल्याची स्थिती आहे.

रावेरातील आवक फेब्रुवारीअखेर

खानदेशात पुन्हा एकदा थंडीचे आगमन झाले असून, यामुळे केळीची आवक लांबणीवर पडणार आहे. कारण थंडीत केळी पक्व होण्याची गती मंद होते. यामुळे खानदेशात जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर भागातून केळीची आवक फेब्रुवारीअखेर सुरू होईल. या काळात या भागात अधिकची निर्यातक्षम केळी उपलब्ध होईल. याच काळात आखातातील निर्यातीसही गती येईल, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT