Sugar Export
Sugar Export  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Export : येत्या हंगामात साखर निर्यातीसाठी दोन टप्प्यांत परवानगी?

Raj Chougule

कोल्हापूर : यंदाच्या साखर हंगामातही विक्रमी साखर उत्पादित (Record Sugar Production) होणार असल्याने जादा निर्यात (Excess Sugar Export) अपरिहार्य आहे. केंद्र शासन मात्र दोन टप्प्यांत निर्यातीला परवानगी (Permission To Sugar Export) देण्याचा विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यंदाच्या हंगामात सुमारे ८० लाख टन साखर निर्यातीस (Sugar Export) परवानगी मिळण्याची शक्यता आहे. ही परवानगी दोन टप्प्यांत देण्याचा विचार सुरू असून, सुरुवातीला ५० लाख टन निर्यातीस परवानगी मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित परवानगी विक्री कोटा व स्थानिक बाजारात साखरेची उपलब्धता पाहूनच मिळेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. असे झाले तर गेल्या वर्षीपेक्षा निर्यात कमी होण्याचा अंदाज आहे.

सरकार दोन टप्प्यांत निर्यातीस परवानगी देण्याच्या निर्णयापर्यंत आले असले तरी ही निर्यात ओपन जनरल लायसन्स (ओजीएल) अंतर्गत होईल की कोटा प्रणालीनुसार, याबाबत परिस्थिती स्पष्ट नाही. ओजीएलअंतर्गत निर्यातीला परवानगी द्यावी, अशी उद्योगाची मागणी आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत गेल्या वर्षी अतिशय गतीने साखर निर्यात झाली. अगदी तशीच निर्यात या वर्षीही व्हावी, अशी साखर उद्योगाची मागणी आहे. केंद्र मात्र सरसकट परवानगी देणार नाही, असेच सध्याचे तरी चित्र आहे. सुरुवातीच्या टप्प्यात निर्बंध नसल्याने भरपूर साखर निर्यात झाली. पण, महागाईची शक्यता वाढली. यामुळे केंद्राला यात हस्तक्षेप करावा लागून निर्यातीवर निर्बंध आणावे लागले. यंदा असे होऊ नये यासाठी केंद्रीय स्तरावरून पहिल्यापासूनच टप्प्याटप्प्याने निर्यातीला परवानगी देण्याचा विचार सुरू आहे. साधारणतः एकूण उत्पादनाच्या १५ टक्के निर्यात असावी असे धोरण केंद्र सरकार आखत आहे. यामुळे यंदाही चांगली निर्यात होईल, अशी शक्यता आहे. हे धोरण अवलंबले तर ६० लाख टन साखर निर्यात होऊ शकते. हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात साखर विक्रीची परिस्थिती पाहून सरकार दुसऱ्या टप्प्यातील निर्यातीबाबत निर्णय घेऊ शकते.

२०२२-२३ साखर हंगामात भारताचे साखरेचे उत्पादन अंदाजे ४०० लाख टन असण्याचा अंदाज आहे, त्यापैकी ४० लाख टन साखर इथेनॉल तयार करण्यासाठी वापरली जाईल. गेल्या हंगामाच्या तुलनेत या हंगामात इथेनॉलसाठी ६ लाख टन साखर जादा वापरली जाईल, अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी इथेनॉलसाठी ३४ लाख टन साखर वापरली जात होती. यंदा हे प्रमाण ४० लाखांवर जाईल, असा केंद्राचा अंदाज आहे. इथेनॉलसाठी साखर वापर झाल्यानंतर ३५० लाख टन साखर शिल्लक असेल. २७५ लाखांची स्थानिक विक्री अपेक्षित आहे. साखर उद्योगाने मात्र जास्तीत जास्त साखर निर्यात होणे फायदेशीर असल्याचे म्हणणे सरकारकडे मांडले आहे.

साखर निर्यातीची गती मंदावली

गेल्या वर्षी ओपन जनरल लायसन्सअंतर्गत अनेक कारखान्यांनी साखरेची जोरदार विक्री अन्य देशांना केली. पण केंद्राने हंगामाच्या शेवटीशेवटी निर्यातीला खो घातला. यामुळे जूननंतर आजतागायत साखर निर्यातीची गती मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. केंद्र गेल्या हंगामातील साखरेला अजूनही खुल्या प्रमाणात निर्यात करण्यास परवानगी देत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या हंगामावरही केंद्र निर्यातीवर लक्ष ठेवून असेल. यामुळे गेल्या वर्षीइतकी निर्यात होण्याची शक्यता कमी असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT