Pune News: कार्तिक वद्य त्रयोदशी... वेळ दुपारी सव्वा बाराची... माउलींच्या समाधी समिप संत नामदेव महाराजांच्या पादुका... विणा मंडपात सुरू असलेले कीर्तन.... कीर्तनात तल्लीन झालेले भाविक... अशा वातावरणात माउलींचा ७२९ वा संजीवन समाधीदिन सोहळा सोमवारी (ता. १७) आळंदीत पार पडला..नामदास महाराजांनी ‘नामा म्हणे आता, लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ’, असे अभंग म्हणताच माउलींच्या समाधी प्रसंगाच्या आठवणीने गहिवरलेल्या लाखो भाविकांनी समाधीवर तुळशीच्या मंजिऱ्यांसह पुष्पवृष्टी केली. माउलींच्या विरहाच्या ७२९ व्या वर्षांपूर्वीच्या आठवणीने वारकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. सकाळपासूनच मंदिर परिसर लाखो वैष्णवांच्या गर्दीने गजबजून गेला होता..Sanjeevan Samadhi : आळंदीत माउलीनामाचा गजर.महाद्वारात गुरुवर्य हैबत बाबांच्या पायरीजवळ ऋषिकेश आरफळकर यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर हैबत बाबांच्या दिंडीने मंदिर प्रदक्षिणा केली. सकाळी सात वाजता विष्णू मंदिरातून नामदेव महाराजांच्या पादुका दिंडीमधून समाधी मंदिरात आणण्यात आल्या. त्यानंतर नामदास महाराजांनी माउलींच्या समाधीची आणि नामदेव महाराजांच्या समाधीची पूजा केली..दहाच्या सुमारास विणा मंडपात नामदेव महाराजांचे सतरावे वंशज रामदास महाराज यांच्या कीर्तनास प्रारंभ झाला. या वेळी विणा मंडपाचा सर्व परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. शहरातील नगर प्रदक्षिणामार्ग वैष्णवांच्या गर्दीने फुलून गेला होता. प्रत्येक जण समाधी सोहळ्याच्या प्रसंगाला याची देही याची डोळा हजेरी लावण्यासाठी मंदिराच्या दिशेने मार्गक्रमण करीत होता..Dnyaneshwar Maharaj Palkhi: माउलींच्या पालखी सोहळ्यातील पुरंदावडेचे रिंगण उत्साहात.माउली मंदिरातील विणा मंडपात माउलींच्या समाधी प्रसंगाचे कीर्तन सुरू होते. कीर्तनात नामदास महाराजांनी बांधल्या तळ्याचे फुटलासे पाट, ओघ बारा वाट मुरडताती, असे म्हणतात उपस्थितांचा भावनांचा बांध फुटला आणि आबाल वृद्ध रडू लागले. समाधीचा प्रसंग जवळ येऊ लागतात साऱ्यांना गहिवरून आले. रामदास महाराजांनी माउली समाधीला गेल्याचा उल्लेख केला. या वेळी अनेकांनी तुळशीच्या मंजिऱ्यांसह पुष्पवृष्टी माउलींच्या समाधीवर केली. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आरत्या म्हणत समाधी सोहळ्याची भावपूर्ण वातावरणात सांगता झाली..या वेळी नामदेव महाराजांचे वंशज नामदास कुटुंबीयांचा नारळ प्रसाद देऊन आळंदी देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला. या वेळी माधव महाराज रामदास, केशव महाराज नामदास आणि कुटुंबीय याचबरोबर आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ, ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, चैतन्य महाराज कबीर, ॲड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. माधवी निगडे, ॲड. विकास ढगे, डी. डी. भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांची उपस्थिती होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.