Pune News: पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे संतप्त शेतकऱ्यांनी गुंजवणी बंद जलवाहिनी प्रकल्पाचे काम रविवारी (ता. ९) बंद पाडले. शेतकऱ्यांचा विश्वासघात करून आणि १९९३ च्या मूळ सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष करून या प्रकल्पाचे काम मनमानी पद्धतीने सुरू करण्यात आल्याचा आरोप संबंधित शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे. हे काम तातडीने थांबवून सर्वेक्षण दुरुस्त न केल्यास आजपासून (ता. १८) वाल्हे येथे प्राणांतिक उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला. .जुन्या सर्वेक्षणानुसार गुंजवणी धरणातून वाल्हे परिसराला बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होणार होता. मात्र, सध्याच्या नियोजनात त्या सर्वेक्षणाचा विचार न करता नव्या आराखड्यानुसार काम सुरू आहे..Water Management: लघू प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट.त्यामुळे बापसाई वस्ती, पवारवाडी, वागदरवाडी, गायकवाडवाडी, बहिर्जीची वाडी, सुकलवाडी, राख, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी आदी भागांतील शेती धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चुकीच्या रचनेमुळे सर्व वाडी-वस्त्यांना समान प्रमाणात पाणी मिळणार नाही, अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली..Water Reservation: अकोला जिल्ह्यासाठी पाण्याचे ९०.३४ दलघमी आरक्षण मंजूर.रविवारी सकाळी शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. बैठकीनंतर शेतकऱ्यांनी प्रकल्पस्थळी धाव घेत काम बंद केले आणि अधिकाऱ्यांना फोनद्वारे कळवून इशाराही दिला. काही दिवसांपासून गुंजवणी प्रकल्प बंद जलवाहिनी पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम सुरू आहे..मात्र, शेतकऱ्यांचा विश्वास न जपता मनमानी पद्धतीने काम होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा अवलंबला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.