Tomato Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tomato Market : टोमॅटो वगळता सर्व शेतीमालाच्या किमतींत घट

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती ः सप्ताह २३ ते २९ सप्टेंबर २०२३

या वर्षी पावसात मोसमी व भौगोलिक विषमता अनुभवास आली; पण त्याचा खरीप उत्पादनावर व आवकेवर किती परिणाम होईल हे पुढील सप्ताहात अधिक स्पष्ट होईल.

ऑक्टोबरपासून NCDEX मध्ये २० फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी मक्याचे फ्यूचर्स व ऑप्शन व्यवहार सुरू होतील. यासाठी बेसिस डिलिव्हरी ठिकाण छिंदवाडा राहील; सांगली डिलिव्हरीसाठी रु. १५० प्रीमिअम राहील.

तसेच १९ एप्रिल डिलिव्हरीसाठी हळदीचे फ्यूचर्स व ऑप्शन व्यवहार सुरू होतील. यासाठी बेसिस डिलिव्हरी ठिकाण निजामाबाद राहील. सांगली डिलिव्हरीसाठी राजापूर प्रत व रु. ३ प्रीमिअम राहील.

हळदीतील तेजी आता संपली असून, किमती घसरू लागल्या आहेत. कापसाची आवक हळूहळू वाढू लागली आहे. गेल्या महिन्यात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. या सप्ताहात टोमॅटो वगळता सर्व वस्तूंच्या किमती घसरल्या.

२९ सप्टेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ०.९ टक्क्याने घसरून रु. ६०,९८० वर आले होते. या सप्ताहात ते रु. ६१,००० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव ०.१ टक्क्याने वाढून रु. ६०,७८० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स रु. ६१,३६० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ०.६ टक्क्याने अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,५२४ वर आले होते. या सप्ताहात ते ०.५ टक्क्याने घसरून रु. १,५१६ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५२० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५५२ वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा २.३ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात रु. २,०८५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. २,०९० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (ऑक्टोबर डिलिव्हरी) किमती रु. २,०९९ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. २,१२४ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.२ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १३,६९१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. १३,३२७ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमती २.५ टक्क्यांनी घसरून रु. १४,०२२ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. १४,७२४ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या १०.५ टक्क्यांनी जास्त आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ३.३ टक्क्यांनी वाढून रु. ६,२२५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.२ टक्क्याने घसरून रु. ६,१५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. गेल्या तीन महिन्यांत हरभऱ्याचे भाव सातत्याने वाढत होते; मात्र १ सप्टेंबरपासून ते घसरत आहेत.

मूग

मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात ३.७ टक्क्यांनी वाढून रु. ९,००० वर आली होती. या सप्ताहात मात्र ती २.२ टक्क्यांनी घसरून रु. ८,८०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) रु. ५,००० वर आली होती. या सप्ताहात ती २ टक्क्यांनी घसरून रु. ४,८९९ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) गेल्या सप्ताहात ३ टक्क्यांनी घसरून रु. १०,४०० वर आली होती. या सप्ताहात ती १.४ टक्क्याने घसरून रु. १०,२५९ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे.

कांदा

कांद्याची किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,८०० होती; या सप्ताहात पुण्यातील किंमत रु. १,७६० वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ४३६ वर आली होती. या सप्ताहात ती रु. ५२५ वर आली आहे. ४ ऑगस्ट रोजी संपलेल्या सप्ताहात देशातील आवक ४२,००० टन झाली होती; २२ सप्टेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात आवक १,१४,००० टन झाली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT