Soybean Rate Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Rate : सोयाबीन बाजाराला आधार मिळेल का?

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. मात्र देशातील सोयाबीन बाजार आजही स्थिर होता. मात्र पुढील काळात देशातील सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो.

Anil Jadhao 

अनिल जाधव

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. मात्र देशातील सोयाबीन बाजार आजही स्थिर होता. मात्र पुढील काळात देशातील सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो. त्यासाठी काही सकारात्मक घटक बाजारात दिसत आहेत, अशी माहिती जाणकारांनी दिली.

देशातील सोयाबीन दर आजही स्थिर होते. सोयाबीनला ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. देशातील बाजारात आजही जवळपास अडीच लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ६०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीनचे दर नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्री कमी केली. त्यामुळे सोयाबीनचा बाजार टिकून आहे, असे जाणकारांनी सांगितले.

आंतरराष्ट्री बाजारात मात्र आज सुधारणा पाहायला मिळाली. चीनमधील कोरोना निर्बंध कमी होत आहेत. त्यामुळे चीनमधून सोयाबीनला मागणी वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच अर्जेंटीनातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. कमी पावसामुळे अर्जेंटीनातील सोयाबीन लागवड पिछाडीवर आहे. परिणामी अर्जेंटीनातील सोयाीबन उत्पादनही कमी राहण्याचा अंदाज आहे.

जागतिक पातळीवर घडणाऱ्या या दोन्ही घटनांचा सकारात्मक परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारारवर दिसून येत आहे. आजही सोयाबीनच्या दर वाढून १४.८० डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयापेंडचे दर ४६३ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते. सोयापेंडच्या दरात आजही सुधारणा झाली होती.

सोयातेलाच्या दरातही आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. आज सोयातेलाचे वायदे ६१.३४ सेंट प्रतिपाऊंडपर्यंत वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात सध्या चढ उतार सुरु आहेत. पामतेलाचे मागील काही दिवसांपासून एका भावपातळीवर स्थिर आहेत. तर सूर्यफूल तेलाचे दर कमी झाले. त्याचा दबाव सोयाबीन तेलावर दिसून येत आहे. 

……………
हे घटक पुरक ठरतील?
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर सुधारण्यास पूरक स्थिती निर्माण होऊ शकते. अमेरिका आपल्या जैवइंधन धोरणात बदल करणार आहे. अमेरिकेने सोयातेलाचा वापर जैवइंधनात वाढवल्यास त्याचा सकारात्मक परिणाम खाद्यतेल बाजारावर होऊ शकतो. तर पामतेल एका भावपातळीपेक्षा कमी होताना दिसत नाही. तसेच इंडोनेशिया जैवइंधनात पामतेलाचा वापर ३० टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढविणार आहे. या सर्व घटकांमध्ये खाद्यतेलाच्या दरात सुधारणा होऊ शकते.

…………..
यंदाची दरपातळी काय राहील?
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर वाढत आहेत. सोयातेलाचेही दर वाढल्यास देशातील सोयाबीनलाही आधार मिळू शकतो. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू सकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT